प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट, म्हणाले; ‘पट्या मी तुला खूप मिस करणार यार’, आपली ४४ वर्षाची मैत्री….

प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट, म्हणाले; ‘पट्या मी तुला खूप मिस करणार यार’, आपली ४४ वर्षाची मैत्री….

मृ’त्यू हे निसर्गाचं अटळ सत्य आहे आणि हे प्रत्येकाला मान्य करावाच लागत. भूतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला मृ’त्यूशी सामना करावाच लागतो. मग ती श्रीमंत असो वा गरीब, सामान्य माणूस असो वा सेलेब्रिटी. पण जन्म आणि मृ’त्यूच्या या कालावधीमध्ये जुळले जातात ऋणानुबंध.

अशाच ऋणानुबंधापैकी एक म्हणजे मैत्रीचे नाते. रक्ताचे नसले तरी त्याहूनही घट्ट असे हे नाते. शाळेतुन सुरु होणारी ही मैत्री आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्मरणात राहते ती मैत्री. अशीच काहीशी मैत्रीची व्याख्या प्रशांत दामले यांनी त्यांचा मित्र प्रदीप पटवर्धन गेल्याने व्यक्त केली आहे, तेच आपण जाणून घेणार आहोत.

प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन यांची मैत्री फार जुनी. अगदी कॉलेजपासूनची. जी आजवरही टिकली. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने आज प्रशांत दामले एकटे पडले आहेत, अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुकवरून केली. प्रदीप पटवर्धन हे अतिशय उच्च श्रेणीचे कलाकार होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अनेक मालिका आणि नाटके गाजविली.

‘मोरूची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील प्रचंड गाजलेले नाटक ठरले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक खास ओळख मिळाली. प्रदीप पटवर्धन हे गिरगाव येथील स्थायिक होते. कॉलेज काळापासूनच त्यांनी एकांकिका स्पर्धेत काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कालांतराने व्यावसायिक नाटकाकडे ते वळाले. मराठी रंगभूमीवरील कलाकार म्हणून त्यांची ओळख होती..

त्यांनी अनेक नाटकात चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे नवरा माझा नवसाचा, लवकालात, भूताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. प्रदीप यांना सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे.

अशातच प्रदीप यांच्या 44 वर्ष जुन्या मित्राने सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप पटवर्धन यांच्या गाजलेल्या मोरूची मावशी नाटकात प्रशांत दामले सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. प्रदीप आणि प्रशांत यांची मैत्री तब्बल चौवेचाळीस वर्ष जुनी आहे. अगदी कॉलेजवयीन असल्यापासून मैत्री असलेल्या आपल्या लाडक्या मित्राला प्रशांत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ते असं लिहितात, “पट्या… प्रदीप पटवर्धन… मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या…

सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती.

त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार 😓😓”. प्रदीप आणि प्रशांत यांची मोरूची मावशी नाटकातील जोडी सुपरहिट ठरली होती. या नाटकातला एक जुना व्हिडिओ सुद्धा सध्या बराच प्रसिद्ध होत आहे.

या व्यतिरिक्त सुद्धा प्रदीप यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. महाराष्ट्राची लोकधारा, चल काहीतरीच काय, एक फुल चार हाफ, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा अशा अनेक नाटक आणि सिनेमांत त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.