प्रभासने नाकारलेल्या चित्रपटात काम करून ‘हे’ कलाकार झाले सुपरस्टार, प्रभासने ‘या’ चित्रपटाला नकार दिला म्हणून अल्लू अर्जुन…

प्रभासने नाकारलेल्या चित्रपटात काम करून ‘हे’ कलाकार झाले सुपरस्टार, प्रभासने ‘या’ चित्रपटाला नकार दिला म्हणून अल्लू अर्जुन…

बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागाला आता तब्ब्ल सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही या सिनेमाची आणि या सिनेमाच्या कलाकारांची क्रेझ कमी झालेली दिसत नाहीये. खास करुन बाहुबली प्रभासची. प्रभास हा तेलगू इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासूनच एक मोठा स्टार होता. मात्र, बाहुबली सिनेमा मुळे जगभरात त्याला ओळख मिळाली.

अजूनही बाहुबली प्रभास आणि त्यातील कलाकार लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावरच आहेत. सुरुवातीपासूनच प्रभासच्या जबरदस्त लूक आणि अभिनयाची चर्चा सिनेसृष्टीमधे होती. दिग्दर्शक एस एस राजामौली आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत त्याचा मिरची सिनेमा प्रदर्शित झाला होता.

तो सिनेमा सुपरहिट ठरला, त्यामुळे पुन्हा बाहुबली सिनेमामध्ये हे त्रिकुट एकत्र आले, तेव्हा तो सिनेमा देखील हिट होणारच अशी शाश्वती होती. आणि झालं तसंच, बाहुबली चित्रपट भारतातील सर्वात हिट चित्रपट ठरला. आणि जगभरात देखील त्याची चर्चा झाली होती.

बाहुबली स्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट राधे श्याम अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाची कथा आणि संकल्पना खूपच वेगळी आहे. याच कारणामुळे प्रभासच्या स्क्रिप्टच्या निवडीबाबत लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. फिल्मस्टार प्रभास अतिशय काळजीने चित्रपट साईन करतो. त्यामुळे त्याने असे चित्रपट नाकारले, जे नंतर सुपरहिट ठरले.

प्रभासने नाकारलेल्या चित्रपटांमुळे टॉलीवूड सुपरस्टार महेश बाबू आणि अल्लू अर्जुन यांची चित्रपट कारकीर्द घडवली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महेश बाबूच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ओकाडूची ऑफर पहिल्यांदा प्रभासला मिळाली होती. त्यावेळी प्रभासला या चित्रपटाची कथा थोडी जोखमीची वाटली. त्यामुळे त्याने हा चित्रपट नाकारला. नंतर हा चित्रपट महेश बाबूकडे गेला आणि मग हा चित्रपट सुपरहिट ठरला.

प्रभासला यापूर्वी दिग्दर्शक सुकुमार यांच्या आर्या चित्रपटाची ऑफरही आली होती. त्यावेळी अभिनेत्याला हा चित्रपट आवडला नाही आणि त्याने चित्रपट नाकारला. पुढे या चित्रपटात अल्लू अर्जुनची एंट्री झाली आणि या चित्रपटाने या अभिनेत्याला रातोरात मोठा स्टार बनवले.

प्रभासने नाकारलेल्या चित्रपटांमुळे फक्त महेश बाबू, अल्लू अर्जुनच नाही तर अभिनेता नितीन (दिल चित्रपट), ज्युनिएर एनटीआर (सिम्हाद्री, बृंदावनम, ओसारवेल्ली), राम चरण (नायक), रवि तेजा (किक, डॉन श्रीनु) हे कलाकार स्टार झाले.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.