प्रभासच्या ‘राधे श्याम’वर भारी पडला ‘द कश्मीर फाईल्स’, पहा दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई…

प्रभासच्या ‘राधे श्याम’वर भारी पडला ‘द कश्मीर फाईल्स’, पहा दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई…

बाहुबली प्रभासला आज संपूर्ण जगात ओळखले जाते. बाहुबली चित्रपटानंतर साहो या सिनेमात प्रभास झळकला होता. मात्र त्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फार जास्त कमाल करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या ‘राधे-श्याम’ या सिनेमाकडून त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. माघील बऱ्याच महिन्यांपासून या सिनेमाची चर्चा सुरु होती.

प्रभासच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिनेमाचे टिझर प्रदर्शित करण्यात आले होते. राधेश्याम सिनेमात त्याच्यासोबत, पूजा हेगडेला बघण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक होते. कारण सिनेमाचे टिझर अनेकांना खूप आवडले. मात्र असं असलं तरीही, राधे-श्याम सिनेमाला आपली जादू चालवण्यात यश मिळाले नाही.

कारण इतर सर्वचित्रपटांना माघे टाकत सध्या सगळीकडेच एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाचा काय तर राजकीय वर्तुळात देखील या चित्रपटानी जोरदार चर्चा रंगवली आहे. द कश्मीर फाईल्स या सिनेमाने अगदी नि’र्भीडपणे काश्मीरच्या विषयाला थेट हात लावला आहे. बॉलीवूडमध्ये आजपर्यंत दं’ग’ली, जा’तीवा’द या मुद्दयांवर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत.

आणि याच विषयावर द कश्मीर फाईल्स सिनेमा देखील आधारित आहे. इतर सिनेमाच्या तुलनेत सुरुवातीला, या सिनेमाची खूप जास्त चर्चा झाली नव्हती. मात्र या वर्षीच्या सर्वात जास्त वा’दग्र’स्त सिनेमांपैकी एक हा सिनेमा ठरेल, असा अंदाज होता. सिनेमामध्ये दाखवण्यात आलेले दृश्य आणि कलाकारांचा अभिनय यामुळे सिनेमाला चांगलेच यश मिळत आहे.

चिन्मय मांडलेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, सारख्या दिग्ग्ज कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघण्याला प्राधान्य देत आहेत. केवळ १४ कोटींमध्ये बनलेल्या काश्मीर फाईल्स सिनेमा, ३५० कोटींत बनलेल्या राधे-श्याम सिनेमाला थेट टक्कर देत आहे. पहिल्याच दिवशी द काश्मीर फाईल्स सिनेमाने ४.५५कोटी रुपयांची कमाई केली.

तर राधे-श्याम सिनेमाची देखील सारखीच कमाई झाली. दुसऱ्या दिवशी मात्र, द काश्मीर फाईल्सचीही कमाई राधे श्याम सिनेमाहून अधिक झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत द काश्मीर फाईल्स सिनेमांने आपल्या खर्चाच्या ७० टक्के कमाई केली आहे. रविवारचे कलेक्शन अद्याप समोर आलेले नाहीयेत. राधे-श्याम सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रविवार पर्यंत सिनेमाचे सर्व भाषांमधले कलेक्शन मिळून अवघ्या २७-३० कोटींची कमाई झाली आहे.

तर द कश्मीर फाईल्स सिनेमाची जवळपास १० कोटींची कमाई झाली आहे. द कश्मीर फाईल्स सिनेमा, जास्तीत जास्त ५ ते ७ कोटींचा आकडा गाठेल असं अनेकांना वाटत होत. मात्र हे सर्व अंदाज फोल ठरवत सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू बघायला मिळत आहे. त्यामुळे जनता संवेदनशील मुद्दे देखील जाणून घेण्यात आतुर असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.