पुन्हा दिसला अमिताभ बच्चन यांचा मोठेपणा, आजपर्यंत कुणासाठी केलं नाही ते नागराज मंजुळेंसाठी केलं…

पुन्हा दिसला अमिताभ बच्चन यांचा मोठेपणा, आजपर्यंत कुणासाठी केलं नाही ते नागराज मंजुळेंसाठी केलं…

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’हा बहुचर्चित चित्रपट येत्या ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची कथा ही अतिशय रंजक अशी आहे. झोपडपट्टीतील मुले कशाप्रकारे फुटबॉल खेळतात हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

नागराज मंजुळे हे मराठीतील प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. नागराज मंजुळे यांनी याआधी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे काही लघुपटाची निर्मिती केली आहे. सगळ्यात आधी नागराज मंजुळे यांनी छोट्या लघुपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मध्ये येण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल केला असल्याचे सांगण्यात येते. अनेकदा त्यांनी मुलाखतीमधून देखील या बाबत माहिती दिलेली आहे. वंचित समाजाला चिञपटात दाखवून यामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. नागराज मंजुळे यांच्या आजवरच्या चित्रपटांमध्ये समाजातल्या वंचित घटकांना दाखवण्यात आलेले आहे.

नागराज मंजुळे यांनी सगळ्यात आधी पिस्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर नागराज मंजुळे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर, मात्र नागराज मंजुळे यांचा डंका सैराट चित्रपटामुळे वाजला. हिंदी मध्ये देखील या चित्रपटाची लोकप्रियता झाली होती.

हिंदीमध्ये देखील या चित्रपटाचा रिमेक धडक या नावाने करण्यात आला. यामध्ये जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दिसले होते. मराठी मध्ये सैराट या चित्रपटाने तब्बल शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. अजय-अतुल यांचे लयबद्ध संगीत या चित्रपटासाठी लाभले होते. त्यामुळे या चित्रपटाला वेगळ्या प्रकारची उंची मिळाली‌.

नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातही वंचित घटक दाखवण्यात आला आहे. झुंड चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी विजय ही भूमिका साकारली आहे. विजय हे झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे ट्रेनिंग देतात मात्र, असे करत असताना त्यांना अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात. या विरोधात ते बं’ड पुकारतात. असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

या चित्रपट आर्ची आणि परश्यासोबतच फॅन्ड्री फेम जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडेला देखील दाखवण्यात आले आहे. मात्र या चित्रपटा दरम्यान बिग बिंगचा मोठेपणा नागराज मंजुळे यांना दिसला. बिग बी यांनी झुंड सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नागराजसाठी जे केल ते यापूर्वी कधीच कोणासाठी केल नसावं. पुन्हा एकदा बिग बी यांचा मोठेपणा दिसला.

बिग बी अमिताभ बच्चन यांची महानता पुन्हा एकदा समोर आली आहे. अमिताभ झुंड सिनेमामध्ये फुटबॉल कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मुलांना बदलण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देणार अशी त्यांची या सिनेमातील भूमिका असणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना भावुक करणारा आहे. अमिताभ बच्चन यांना या सिनेमाबद्दल पूर्ण विश्वास होता. त्यामुळे जेव्हा सिनेमा अडचणीत सापडला अडचणी आल्या तेव्हा त्यांनी मोठ्या मनानं आपलं मानधन कमी केलं. त्यांचा हा मोठेपणा पाहून त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनीही आपलं मानधन कमी केलं. याबाबत सिनेमाचे निर्माता संदीप सिंह यांनी खुलासा केला.

अभिताभ बच्चन यांना झुंड सिनेमाची स्क्रिप्ट खूप जास्त आवडली. सिनेमाचं बजेट जास्त नव्हतं याची कल्पना त्यांना होती. अडचण समजून त्यांनी आपलं मानधन कमी केलं. अमिताभ म्हणाले की माझ्या मानधनावर जास्त खर्च करण्यापेक्षा सिनेमावर खर्च करा. याबाबत स्वत: निर्मात्याने पुढे येऊन माहिती दिली. अमिताभ यांनी आपल्या कृतीतून ते महान नायक असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.