पुन्हा एकदा शिल्पाचे बाहेर पडले दुःख, म्हणाली ‘या’ अभिनेत्याने मला लग्नाचे खोटे वचन देऊन कित्येक वेळा माझ्यासोबत..

दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा कला वाढदिवस होता. 8 जून 1975 मध्ये शिल्पाचा जन्म झाला होता. ‘बाजीगर’या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली आणि पाठोपाठ जवळपास 40 सिनेमे करत, बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.
चित्रपटांइतकीच शिल्पा पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिली. एकेकाळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. 90च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची प्रेमकथा कुणापासून लपून राहिलेली नव्हती. प्रत्येक मासिकापासून ते चहाच्या दुकानांपर्यंत त्यांच्या प्रेमाविषयी चर्चा होती. 1
994 साली ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती. 2000मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2001मध्ये अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केले.
एकाच वेळी केलं दोघींना डेट
अक्षय कुमार याआधी रवीना टंडनला डेट करत होता. रवीना आणि शिल्पा खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. 1994 साली जेव्हा शिल्पा आणि अक्षय सिनेमात एकत्र काम करते होते तेव्हा अक्षय रवीना डेट करत होता. काही वर्षांपूर्वी शिल्पा आणि रवीना दोघेही डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून आल्या होत्या. यावेळी प्रेमात मिळणारा धोका या विषय निघाला तेव्हा या दोघी खळखळून हसत ‘हे आमच्या दोघींपेक्षा कोण चांगले ओळखू शकेल?’असे म्हणाल्या होत्या.
अक्षयने मला धो’का दिला
शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यावर अक्षय कुमार कधीच काही बोलला नाही. पण शिल्पाने मात्र एका मुलाखतीत आपल्या मनातील भडास काढली होती. अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. ब्रेकअपनंतर 2000 मध्ये शिल्पा शेट्टीने मुलाखत दिली होती.
अक्षय कुमारने माझा विश्वास’घात केला. त्याने ‘टू टायमिंग’ केले, असे ती म्हणाली होती. अक्षयने माझा वा’पर केला. दुसरी मिळाल्यावर मला सोडून दिले. त्याने मला फ’सवले. दगा दिला. मला खात्री आहे की काळ याचा हिशोब ठेवेल. अक्षयने जे काही केले ते एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल, असेही ती म्हणाली होती.
जेव्हा ट्विंकल खन्नाबाबत शिल्पाला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, ‘ट्विंकल खन्नाकडून तिला काहीही तक्रार नाही. कारण दगा तिला अक्षयने दिला होता,’ असे ती म्हणाली होती. यावेळी तिला अश्रू रोखता आले नव्हते.