‘पावखिंड’ चित्रपटाचे रितेश देशमुखने केले कौतुक, चित्रपटाच्या कमाईबद्दल खुलासा करत म्हणाला; तुम्ही सर्वांनी…

‘पावखिंड’ चित्रपटाचे रितेश देशमुखने केले कौतुक, चित्रपटाच्या कमाईबद्दल खुलासा करत म्हणाला; तुम्ही सर्वांनी…

मराठी चित्रपटसृष्टी तशी तर पूर्वीपासूनच खूप मोठी आहे, असं म्हणलं तरी चुकीचं नाही ठरणार. सिनेसृष्टीने आपला सुवर्णकाळ जरी बॉलीवूडच्या रूपात अनुभवला असला. तरीही, चित्रपटसृष्टीला आपल्या देशामध्ये जीवनदान देण्याचे काम मराठी कलाकारांनीच केलं.

मधल्या काळात बॉलीवूड आणि इतर भाषेतील चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीवर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा अनेक मराठी चित्रपट केवळ बॉलीवूडच नाही तर जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. न्यू’ड, किल्ला, हरिश्चंद्राची फॅक्टरी, जोगवा, सैराट, देऊळ, व्हेंटिलेटर, फॅन्ड्री यासारख्या सिनेमांनी मराठी सिनेमामध्ये प्रेक्षकांची रुची अधिक जास्त वाढवली.

आणि आता पुन्हा एकदा सगळीकडेच मराठी सिनेमाची चांगलीच चर्चा रंगल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. ऐतिहासिक सिनेमा हा मराठी सिनेमासाठी तशी कधीच जमेची बाजू नव्हती. मात्र आता, काही ऐतिहासिक सिनेमांनी हा विचार देखील मोडून काढला आहे. फर्जंद, तुकाराम, फत्तेशिकस्त, हिरकणी, सारख्या सिनेमाच्या रूपात सोळाव्या शतकातील अनेक खास अशा घडामोडी प्रेक्षकांना बघायला मिळाल्या.

विशेष म्हणजे या सिनेमानी चांगेलच कौतुक मिळवले. ग्राफिक्स, सेट आणि जोडीला कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हे सिनेमा चांगलेच लोकप्रियय ठरले. आणि आता फर्जंद, फत्तेशिकस्त नंतर दिगपाल लांजेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अजून एक गौरवगाथा घेऊन आले आहेत.

घोडखिंड मध्ये सिद्धी जोहरसोबत लढताना बाजी बांदल यांनी आपलं प्रा’ण गमा’वले. लाख मेले तरी चालतील मात्र लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी मावळ्यांनी लढा देत मृ’त्यूला आलिंगन दिले. याच शौर्यगाथेला दिगपाल लांजेकर यांनी आपल्या ‘पावनखिंड’ सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर उमटवले.

या सिनेमाचे सर्वच स्तरातून तोंडभरून कौतुक होत आहे. हा सिनेमा बघताना सर्वजण मंत्रमुग्ध होत आहेत. अत्यंत सुंदर असा अनुभव हा सिनेमा बघताना बघताना प्रेक्षकांना मिळत आहे. यामुळे या सिनेमाने आता नवीन विक्रम बनवला आहे. कमाईच्या बाबतीत देखील, पावनखिंड सिनेमाने अनेक सिनेमानं माघे टाकले आहे.

आता या सिनेमाचे कौतुक करण्यासाठी रितेश देशमुख देखील पुढे सरसावला आहे. या सिनेमाच्या कमाईबद्दल रितेशने ट्विट केले आहे. ‘हे अविश्वसनीय आहे!!! पावनखिंड टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन! चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार,’ असं ट्विट करत रितेशने तरण आदर्शचे पोस्ट शेअर केले.

तरण आदर्श एक चित्रपट व्यापार विश्लेषक आहे. त्यामुळे सध्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा, सरकाराच्या नियमांनुसार को’रो’नाच्या पार्श्वभूमीवर थिएटर मध्ये अर्ध्याच प्रेक्षकांची उपस्थिती असू शकत होती. मात्र असं असलं तरीही, या सिनेमाची चांगलीच कामे झाली आहे.

अजून देखील सिनेमाचे सर्वच शो हाऊस-फुल आहेत. त्यामुळे रितेश देशमुखने, मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले असले तरीही सिनेमाची भरगोस कमाई सुरु आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.