पहिल्यांदाच प्रियांकाने शेअर केले लेक ‘मालती’चे फोटो , निक सारखीच दिसते लेक पहा फोटो

पहिल्यांदाच प्रियांकाने शेअर केले लेक ‘मालती’चे फोटो , निक सारखीच दिसते लेक पहा फोटो

प्रियांका चोप्राने आपल्या लग्नाची कोणतीच बातमी कधीही मीडियापासून लपवून ठेवली नव्हती. त्याउलट अगदी थाटामाटात तिने लग्न केले. तिचे लग्न केवळ बॉलीवूड मधेच नाही तर हॉलीवूड मध्ये देखील एक चर्चेचा विषय बनला होता. त्याच कारण म्हणजे, तिने स्वतः हॉलीवूडमध्ये देखील चांगलाच जम बसवला आहे. सोबतच तिचा नवरा निक जोनस एका म्युझिक बँडचा गायक आहे.

जोनस ब्रदर्स म्हणून त्यांचे बँड जगप्रसिद्ध आहे. हॉलीवूडमध्ये निक आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचे चांगलेच मोठे नाव आहे. ऑस्करच्या अवॉर्ड कार्यक्रमामध्ये निक आणि प्रियांकाची ओळख झाली आणि ती छोटीशी ओळख प्रेमात रूपांतरित झाली. प्रियांका चोप्राचे वय ३९ वर्षे असून निक केवळ २९ वर्षांचा आहे. म्हणजेच निक तिच्यापेक्षा १०वर्षांनि लहान आहे.

हा देखील एक खूप मोठा मुद्दा बनला होता. पण म्हणतात ना, जब प्यार किया तो डरना क्या? म्हणून प्रियंका आणि निकने अगदी बिनधास्त आपल्या नात्याची कबुली दिली. सर्वात पहिले दोघांचा लोका सेरेमनी झाला. आणि नंतर जोधपूरमध्ये भारतीय आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने विवाह झाला. त्यांचे लग्न संपूर्ण जगात मोठा चर्चेचा विषय होता.

प्रियांका आणि निक आता एका मुलीचे पालक झाले आहेत. तिने एका मासिकाशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, भविष्यात मूल माझ्या आणि निकच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असेल आणि जेव्हा मी कुटुंबासोबत पुढे जाण्याचा विचार करेन, तेव्हा मला आयुष्यात थोडे हळूहळू पुढे जायला आवडेल.

मात्र, ती इतक्या लवकर आई होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. पण आता ती मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लेक मालतीबरोबर फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं एका प्रसिद्ध मालिकाच्या कव्हर पेजसाठी लेकीबरोबर फोटोशूट केलं.

लेक मालतीबरोबर प्रियांका पहिल्यांदा मासिकात झळकली. नुकतीच प्रियांका कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर नवरा आणि लेकीबरोबर मज्जा करताना दिसली. प्रियांकानं नवरा निक आणि लेक मालतीबरोबर खास फोटो शेअर केलेत. मात्र यावेळीही प्रियांकानं लेकीचा चेहरा काही दाखवलेला नाही.

लेकीबरोबरचे फोटो शेअर करताच प्रियांका पुन्हा ट्रोल झाली आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या तिन्ही फोटोंमध्ये ती लेकीबरोबर मज्जा करताना दिसतेय. हे त्रिकोणी कुटुंब पाहून दोघांच्या चाहत्यांनी देखील प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. असं असलं तरी प्रियांकाची लेक नक्की कशी आणि कोणासारखी दिसते हे पाहण्यासाठी सगळेच आतूर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12