‘परश्या’ आता बॉलिवूड मधून करणार दमदार एन्ट्री, या दिग्गज अभिनेत्यासोबत निभावणार ‘सोल्जर’ची मुख्य भूमिका…

‘परश्या’ आता बॉलिवूड मधून करणार दमदार एन्ट्री, या दिग्गज अभिनेत्यासोबत निभावणार ‘सोल्जर’ची मुख्य भूमिका…

मराठी चित्रपटसृष्टीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’मधील परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर तुम्हाला आठवत असेल. आकाशचा हा पहिलाच चित्रपट. आणि या चित्रपट तरुणाईला अगदी वेड लावलं. या चित्रपटामधील आर्ची-परशाची जोडी तर आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

या चित्रपटापासूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आता आकाशचा पूर्णच कायापालट झाला आहे. एका हिंदी वेबसीरिजसाठी आकाशने आपल्या लूकवर मेहनत घेतली आणि त्याचा हा नवा लूक पाहून नेटकरी ही अवाक् झाले आहेत. आता लवकरचं आपल्या सर्वांचा लाडका परश्या बॉलीवूड मध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

होय, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘१९६२ – द वॉर इन द हिल्स’ वेबसीरिज २६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये आकाशबरोबरच, अभय देओल, सुमित व्यास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजची कथा भारत-चीनमध्ये झालेल्या यु’द्धावर आधारित आहे.

आकाश आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत:- आपणास सांगू इच्छितो कि आकाश या वेबसीरिजमध्ये किशन नावाच्या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. त्याच्यासाठी ही भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. आकाश म्हणतो कि, ही वेबसीरिज म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. खऱ्या आयुष्यात तर आर्मी ऑफिसर बनण्याचं स्वप्न मी पूर्ण करु शकलो नाही.

पण या सीरिजच्यानिमित्ताने मला ही संधी मिळत आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणावेळी जेव्हा मी आर्मी ऑफिसरचा ड्रेस घालायचो तेव्हा माझं मन अगदी आनंदाने भरुन यायचं. मला वास्‍तविक जीवनात मिळाली नाही तरी रीयल जीवनामध्‍ये सैन्‍याचा पोशाख परिधान करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद झाला.

मला अत्‍यंत खास वाटले. असे वाटले की, मी सै’न्‍याचाच भाग आहे आणि मी स्‍वत:कडे त्‍याच दृष्टिने पाहिन.’ तसेच या वेबसीरिजसाठी आकाश फारच उत्साही आहे. आणि तो यासाठी खूप मेहनत घेत आहे. अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. सीरिजमध्ये आकाश हा किशन नामक जवानाची भूमिका साकारत आहे.

ही वेबसीरिज म्हणजे आकाशसाठी सुवर्णसंधी आहे. या वेबसीरिजमधील आकाशचा लूक रिव्हील होताच त्याच्या चाहत्यांनी त्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या लूकमध्ये आकाश अगदी उठून दिसतोय. शिवाय त्याने या भूमिकेसाठी आपलं वजन देखील वाढवलं आहे.

याआधीही आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. एक तरुण रोमॅण्टीक हिरो म्हणून आकाशची प्रतिमा तयार होत असतानाच तो वेगळ्या आणि हटके भूमिका करण्यासही पुढे सरसावला आहे. या वेबसीरिज व्यतिरिक्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे.

या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळणार आहे. ‘१९६२: द वॉर इन द हिल्‍स’ ही वेब सीरिज येत्या २६ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *