पतीपासून घ’टस्फो’ट, चित्रपटांपासून दूर असूनही करिश्मा कपूर या मार्गातून कमावते करोडो रुपये वाचून चकित व्हाल…

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर ही 90च्या दशकाची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्माने तिच्या सौंदर्याने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिश्माने 1991 साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती.

पहिल्या चित्रपटातून धमाका केल्यानंतर, करिश्माने पुन्हा एकामागून एक अनेक चित्रपटांत काम केले. करिश्मा तिच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तथापि, मुले आणि कुटुंबीयांमध्ये व्यस्त झाल्यानंतर करिश्माने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले होते.

त्यानंतर बर्‍याच वर्षांच्या विश्रांतीनंतर तिने मनोरंजन विश्वात पुनरागमन केले होते, पण यावेळी तिची जादू पूर्वीसारखे काम करू शकली नाही. जरी करिश्मा आता चित्रपटांपासून दूर असली, तरी याचा तिच्या कमाईवर परिणाम झाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा अजूनही कोट्यवधींची कमाई करते. यासह तिच्याकडे अनेक लक्झरी वाहनांचा संग्रहही आहे.

यापूर्वी करिश्मा कपूर अभिषेक बच्चनसोबत लग्न करणार होती. परंतु काही कारणांमुळे हे ना’तं तुटले. त्यानंतर 2003 मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले. सुरुवातीला सर्व ठीक होते. अदारा आणि कियान ही दोन मुलेही जन्माला आली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघांनीही 2014 मध्ये घ’टस्फो’टासाठी अर्ज केला होता. 2016 मध्ये दोघांचे घ’टस्फो’ट झाले.

घ’टस्फो’ट झाल्यानंतर तिच्या पतीने मुलांसाठी 14 को’टी रु’पयांचे बॉन्ड खरेदी केले आहेत. केवळ या बाँडमुळे प्रत्येक महिन्याला करिश्माला 10 ला’ख रु’पयांचे व्याज मिळते. याशिवाय करिश्मा कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

करिश्मा कपूरची 12 मिलियन डॉलर्स म्हणजेच ८७ कोटींची मालकीण आहे. तिचा घटस्फोट झाला असला तरी आजही ती चिक्कार पैसे कमावते. तिच्या कडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे ज्यात, मर्सिडीज-बेंझ एस-वर्ग, लेक्सस एलएक्स 470, मर्सिडीज बेंझ ई क्लास , बीएमडब्ल्यू 7 सीरीज, ऑडी Q7. करिश्माचा उत्पन्नाचा श्रोत अभिनय आणि जाहिरात आहे. ज्यामधून तिला खूप पैसे मिळतात.

करिश्माचे पुरागमन
शेवट 2020मध्ये करिश्मा ‘मेंटलहुड’ या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या मालिकेत आईच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या गेल्या होत्या. मात्र, करिश्मा सोडून त्यामध्ये बरेच कलाकार होते. ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आणि करिश्माने त्याद्वारे तिचा डिजिटल डेब्यू केला होता.

सध्या करिश्माने कोणत्याही आगामी प्रकल्पांची घोषणा केलेली नाही. मात्र, ती जाहिरातींमध्ये दिसते. सध्या करिश्मा तिच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे आणि सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच, अनेक बॉलिवूड इव्हेंटमध्येही करिश्मा बघायला मिळते. याशिवाय ती बहिण करीना कपूरसोबत पार्टी करत असते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12