पठाण चित्रपटाबद्दल कंगनाचं वक्तव्य, म्हणाली; ’80 टक्के हिंदू असणाऱ्या देशात पठाण….’

पठाण चित्रपटाबद्दल कंगनाचं वक्तव्य, म्हणाली; ’80 टक्के हिंदू असणाऱ्या देशात पठाण….’

कंगना रनौत नुकतीच ट्विटरवर परतली आहे. 2021 मध्ये तिचे अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. परंतु आता तिचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. याची माहिती कंगनाने स्वतः ट्विटद्वारे दिली आहे. कंगनाने ट्विट केले आहे की, तिला पुन्हा या प्लॅटफॉर्मवर आल्याने चांगले वाटत आहे.

कंगना रनौतचा ट्विटर आयडी मे २०२१ मध्ये सस्पेंड करण्यात आला होता. तिच्यावर ट्विटरच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. आपल्या ट्विटद्वारे द्वेष पसरवण्याचे काम केले होते, या आरोपाखाली तिचे अकाऊंट सस्पेंड झाले होते. इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंगनाचा आयडी लवकरच रिकव्हर होईल, असे मानले जात होते.

आणि आता अगदी तसच बघितल जात आहे. कंगनाचा आयडी रिस्टोअर करण्यात आला आहे. कंगना रणौत ट्विटरवर आपल्या जुन्या स्वभावात परतली आहे. यावेळी तिने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे नाव बदलून टाकण्याचा सल्ला दिला आहे. कंगना म्हणते की, अफगाणिस्तानात लोकांना पठाण म्हटले जाते, त्यामुळे येथे पठाणचे नाव बदलून भारतीय पठाण ठेवावे.

याशिवाय 80% लोकसंख्या हिंदू असलेल्या देशात पठाण नावाचा चित्रपट चालत असेल तर ती खूप मोठी गोष्ट असल्याचे तिने म्हटले आहे. कंगना म्हणते की, शाहरुखचा चित्रपट 10 वर्षांनंतर चालला आहे, त्यामुळे तिला आशा आहे की आगामी काळात तिचे चित्रपट देखील चालतील.

कंगना आपल्या ट्विटमध्ये अशा लोकांवर निशाणा साधला आहे जे पठाणच्या यशाला हिंदू मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तिने लिहिले, ‘जे पठाणला द्वेषावर प्रेमाचा विजय सांगत आहेत. इथल्या लोकांच्या प्रेमामुळेच हा चित्रपट इतका चांगला व्यवसाय करत आहे. ज्या देशात 80% लोकसंख्या हिंदू आहे, तिथे पठाण नावाचा चित्रपट चालतो, ही स्वतःच मोठी गोष्ट आहे.’

एका ट्विटमध्ये कंगनाने पठाणचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. कंगना म्हणते, ‘माझा विश्वास आहे की भारतीय मुस्लिम देशभक्त आहेत आणि अफगाणांपेक्षा खूप वेगळे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही, तिथली परिस्थिती नरकापेक्षाही वाईट आहे.

त्यामुळे चित्रपटाच्या कथेनुसार चित्रपटाचे खरे नाव भारतीय पठाण असावे.’ एका ट्रोलरने कंगनाच्या धाकड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले होते आणि त्याला फ्लॉप म्हटले होते. याला उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘हो, धाकड हा एक मोठा फ्लॉप होता, मी हे कधी नाकारले? शाहरुखचा 10 वर्षांतील हा पहिलाच चित्रपट आहे.

आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, आशा आहे की भारताने त्यांना दिली तशी संधी आम्हाला मिळेल. कारण हा देश खूप महान आणि उदार आहे. जय श्री राम!’ एका ट्रोलरने कंगनाला लिहिले की, पठाण पहिल्या दिवशी जे कमावतो, ते तू आयुष्यभर कमावशील. याला उत्तर देताना कंगनाने लिहिले की, इमर्जन्सी चित्रपट बनवण्यासाठी तिने सर्व मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत, तिची सर्व कमाई आणि बचत संपली आहे.

या पैशांतून मी असा चित्रपट बनवत आहे, जे या देशाच्या संविधानाचा आदर करायला शिकवेल, असे कंगनाने म्हटले आहे. प्रत्येकजण पैसे कमावतो पण कोणीही योग्य ठिकाणी पैसे खर्च करत नाही, असेही तिने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12