न्यू’ड पोज आणि निर्मात्यांसोबत रात्र घालवण्यास नकार दिल्यामुळे, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था; कुणीच देत नाहीये काम..

न्यू’ड पोज आणि निर्मात्यांसोबत रात्र घालवण्यास नकार दिल्यामुळे, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था; कुणीच देत नाहीये काम..

काही दिवसांपूर्वी मीटू या मुद्द्याने चांगलाच जोर धरला होता. त्यावेळी अनेक अभिनेत्रीने आणि काही अभिनेत्यांनी देखील आप-बीती सांगत बॉलीवूड आणि जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्याला आलेल्या कटू अनुभवांबद्दल सांगितले होते. त्यावेळी केवळ बॉलीवूडचं नाही तर इतर क्षेत्रात देखील शोषण केलं जातं हे वास्तव समोर आलं.

मात्र इतर क्षेत्रांचा तुलनेत बॉलीवूडमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. सध्या राज कुंद्रा प्रकरणामुळे, पुन्हा अशीच एक लाट आली आहे. बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेते आपल्याला आलेल्या भयानक अनुभवांबद्दल खुलासा करत आहेत. त्यांच्या या खुलास्याने चंदेरी दुनियेची डा’र्क बाजू पुन्हा एकदा सर्वासमोर मांडली आहे.

जवळपास सर्वच कलाकरांना कधी तर एकदा अश्या अनुभवाला सामोरे जावे लागल्याचे सत्य दिसत आहे. अशाच एका अभिनेत्रीने आता आपला अनुभव सांगितला आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने नेहमीच बॉलीवूड मधील दिग्गज लोकांसोबत काम केल आहे, त्यामुळे ती नक्की कोणाबद्दल बोलत आहे याबद्दल वेगवेगेळे कयास लावण्यात येत आहेत.

दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या रॉकस्टार मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी नर्गिस फाखरी नेहमीच आपल्या हॉट लूकसाठी चर्चेत असते. पहिल्याच सिनेमामध्ये तिने रणबीर कपूर सोबत काम केले होते. इम्तियाज अलीच्या या सिनेमामधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनयामध्ये ठीक ठाक असणारी नर्गिस दिसायला मात्र अत्यंत सुंदर आणि आकर्षित, आणि त्यामुळे हळूहळू तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग वाढली.

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल मध्ये सहभाग घेतला होता. स्वतःला एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून तिने तेव्हाच आपली ओळख बनवली होती. म्हणून बॉलिवूड अभिनय करत असताना, तिने अनेक मॉडेलिंग शोज देखील केली. काही दिवसांपूर्वी ती आणि उदय चोप्रा लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील सुरु होत्या.

अनेकवेळा त्या दोघांना, सुट्टी साठी बाहेर देशात सोबत जाताना पहिले गेले होते. त्यादोघांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या दोघांपैकी कोणीही कधी याबद्दल पुढे येऊन बोललं नाही. हॉऊसफूल या सिरीजमध्ये देखील तिने काम केले आहे. डेव्हिड धवनच्या मै तेरा हिरो सिनेमात तिच्या बो’ल्ड लूकची चांगलीच चर्चा रंगली होती.

त्यातच तिच्या आणि उदय चोप्राच्या ब्रेकअपच्या देखील चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे परत तिला जास्त कुठे बघितले नाही गेले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये नर्गिस म्हणाली की,’मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले होते, तेव्हा मी स्वतःवर काही निर्बंध लावले होते. काम महत्वाचे आहेच, मात्र त्यासाठी काही गोष्टी नाहीच करायच्या हे माझ्या मनाशी नक्की आहे.

त्यामुळे अनेकवेळा काही सिनेमामध्ये शॉर्टलिस्ट होऊन देखील, निर्मात्याला खुश नाही केलं म्हणून मला काम नाही मिळालं. काही दिवसांपूर्वी प्ले’बॉय मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी शोध सुरु होता. माझ्या मॅनेजरने देखील त्यांना संपर्क केला होता, तेव्हा तेदेखील मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते असं समजलं. मात्र त्यांना त्या अड’ल्ट मॅगझीनसाठी न्यू’ड फोटोज पाहिजे होते आणि ते देण्यासाठी मी तैयार नव्हते आणि कधीच राहणार नाही.

अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेलच्या प्रतियोगितामध्ये माझा विजय निश्चित होता, मात्र तिथे देखील एका परीक्षेमध्ये न्यू’ड फोटोज द्यायचे होते. माझा त्यास नकार होता, म्हणून मी सो जिंकण्याची संधी देखील सोडली. आता माझ्याकडे फारसं काम नाहीये. पण मी माझ्या मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड करू शकत नाही. नेटफ्लिक्सचा टोरबाज हा सिनेमा नर्गिस फाखरीचा शेवटचा सिनेमा होता. सध्या तिच्याकडे कोणताही सिनेमा नसून, फारसे मॉडेलिंग प्रोजेक्ट्स देखील नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12