नाना पाटेकरांच्या मांडीवर बसलेल्या ‘या’ मुलाला ओळखलंत का? आज आहे प्रसिद्ध अभिनेता…

८०-९० च्या दशकांत आपल्या अभिनयाने नवीन ओळख निर्माण करणाऱ्या अनेक कलाकारांचे मुलं- मुली आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अनेक स्टारकिड्सने बॉलीवूड पदार्पण केले देखील आहे. त्यापैकी काही आज सुपरस्टार म्हणून ओळखले जातात तर काहींना अजून यश संपादन करायच आहे.
असं असलं तरीही या स्टारकिड्सचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकवेळा हे स्टारकिड्स आपले बालपणाचे फोटोज शेअर करत असतात. स्टारडकीड्सने आपल्या बालपणीच्या शेअर केलेल्या फोटोंवर तर चाहत्यांच्या लाईक्सचा अक्षरशः वर्षावच होतो.
हे स्टारकिड्स जेव्हा आपल्या बालपणाचे फोटो शेअर करतात त्यावेळी त्यांच्यासोबत त्या फोटोमध्ये अजून कोणी तरी मेगा स्टार असतात. आणि मग सगळीकडेच त्या फोटोची चर्चा सुरु होते. सध्या नाना पाटेकर यांचा एक फोटो, एका स्टारकिडने शेअर केला आहे. या फोटोमध्ये नाना पाटेकर यंग दिसत आहेत.
त्यांच्या मांडीवर बसून तो स्टारकिड मस्ती करत असल्याचं दिसत आहे. नाना पाटेकर यांनी १९७८मध्ये गमन या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्याच्या कौशल्याला खरी ओळख मिळाली ती ‘परिंदा’ या चित्रपटातून.
या सिनेमासाठी त्यांना नॅशनल आणि फिल्मफेअर दोन्ही पुरस्कार प्राप्त झाले. त्यानंतर तर नाना पाटेकरांनी कधीच माघे वळून पहिले नाही. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत ते आजतागयात प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहेत. त्यांच्या खास अभिनय शैलीची सर कोणत्याच कलाकाराला येणार नाही.
आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक कलाकरांसोबत काम केले. त्यापैकी जवळपास सर्वच कलाकारांची नाना पाटेकरांसोबत खास मैत्री आहे. त्यामुळे त्या कलाकारांच्या मुलांसोबत देखील नाना खूप छान बॉण्ड शेअर करतात. नानांचा अगदी असाच बॉण्ड या स्टारकिडसोबत असल्याचं वायरल फोटोमधून बघायला मिळते.
त्यांच्या मांडीवर मस्ती करणारा स्टारकिड अजून कोणी नाही तर जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी आहे. नानांसोबत आपला जुना फोटो शेअर करत मिजानच्या कॅप्शनने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘खूप जास्त उत्सुक आहेस ना? पण मिजान कंट्रोल..
View this post on Instagram
चौथ्याच चित्रपटात नाना सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली अजून काय हवं? त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा मान मिळाला म्हणून मी धन्य झालो. खूप काही शिकायला मिळाले.’ असं मिजानने आपल्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. आपल्या अभिनयापेक्षा मिजान वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असतो.
काही दिवसांपूर्वी त्याचा आणि अमिताभ बच्चन यांची नातं, नव्या नवेली सोबतचा त्याचा फोटो सगळीकडे वायरल झाला होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये काही असल्याची चर्चा रंगल्या. मात्र, ‘नव्या माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड असून आम्ही दोघे देखील फक्त चांगले मित्र आहोत.’ असं म्हणत त्याने चर्चाना पूर्णविराम दिला होता.
मिजानने संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाल’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी पद्मावत या सिनेमासाठी त्याने असिस्टंट डायरेक्टरच काम केलं होत. हंगामा चित्रपटामध्ये देखील मिजान झळकला होता. मात्र अभिनेता म्हणून त्याला अद्याप फार कमाल करता आलेली नाही. आता मिरंडा बॉईज या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि या चित्रपटासाठी तो खूप जास्त उत्साहित असल्याचं देखील दिसत आहे.