नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ला प्रेक्षकांची पसंती, तिसऱ्या दिवशी कमाविले एवढे कोटी रुपये..

बॉलिवूडचे शहनाशह अमिताभ बच्चन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट अतिशय चर्चेत होता.
नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यामुळे आणि यामध्ये महानायक बिग बी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सैराटची संपूर्ण टीम एकत्र आली. म्हणजे पुन्हा एकदा प्रेक्षकांना आर्ची आणि पारश्याला एकत्र बघितलं.
दरम्यान, अनेक दिग्ग्ज कलाकारांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आघाडीवर आहे. त्याने त्याच्या घरी चित्रपटाच्या टीमला बोलावून त्यांचे विशेष कौतुक त्याने केले. त्याचबरोबर चित्रपटाचे कथानक त्याला एवढे आवडले कि त्याने थेट संधी मिळाली तर नागराजच्या चित्रपटात काम करेल अशी ईच्छा बोलून दाखवली.
पुढे तो म्हणाला कि, जे आम्ही गेल्या १५-१६ वर्षात केले नाही ते नागराजने करून दाखवले. दरम्यान, साऊथ सुपरस्टार धनुषने देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. चित्रपट पाहून तो म्हणाला कि, हा चित्रपट पाहून मी स्तब्द झालोय, चित्रपटातील कलाकारांचे जेव्हडे कौतूक करावं तेवढं कमीच, त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय देखील उत्तम आहे.
हा चित्रपट वास्तवदर्शी असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर झाली असली तरी कमाई मात्र संथगतीने झाली. मात्र आता या सिनेमाने आता चांगलीच पकड घेतली आहे. वास्तविक दर्शन या सिनेमातून घडत असल्याची चर्चा होत आहे.
त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या सिनेमाने चांगलीच पकड पकडली आहे. ‘झुंड’ सिनेमाने पहिल्या दिवशी १ करोड रुपयांचा गल्ला कमविला. दुसऱ्या दिवशी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सिनेमाने १.५० करोड रुपये कमावले आहेत. तर सिनेमाने आतापर्यंत २.५ करोड रुपयांपर्यंत कमाई झाली आहे.
Box OfficeIndia.com च्या रिपोर्टनुसार, तिसर्या दिवशी म्हणजे रविवारीही चित्रपटाची कमाई चांगली होती. तिसर्या दिवशीही या चित्रपटाने तब्बल 1.50 ते 2 कोटींचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका लोकांना आवडली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षक विजय बोराडे म्हणून वेगळी छाप सोडली आहे. ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावरून हा चित्रपट प्रेरित आहे.
दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी ‘झुंड’ची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. इतकंच नाही तर तो या चित्रपटातही अभिनय करताना दिसला आहे. यापूर्वी 2016 मध्ये ऑ’न’र कि’लिं’गवर आधारित ‘सैराट’ हा मराठी चित्रपटही नागराज पोपटराव मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता.
#Jhund improves in #Mumbai and parts of #Maharashtra on Day 2, but the numbers in some circuits – especially #NorthIndia – are below the mark… Biz needs to multiply on Day 3 for a respectable weekend total… Fri 1.50 cr, Sat 2.10 cr. Total: ₹ 3.60 cr. #India biz. pic.twitter.com/4LZlQYyGa6
— taran adarsh (@taran_adarsh) March 6, 2022