धोनीपेक्षाही विस्फोटक बॅटिंग करणारा ‘हा’ फलंदाज परिवाराचं पोट भरण्यासाठी आज रस्त्यांवर चालवतोय रिक्षा…

धोनीपेक्षाही विस्फोटक बॅटिंग करणारा ‘हा’ फलंदाज परिवाराचं पोट भरण्यासाठी आज रस्त्यांवर चालवतोय रिक्षा…

भारताने यावेळी कॉमनवेल्थ गेममध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राने अतिशय सुरेख कामगिरी केली होती. भालाफेकमध्ये त्यांना आपल्या देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.

त्याचबरोबर अनेकांनी त्याला भेट म्हणून वस्तू तर काहींनी त्याला पुरस्कार म्हणून पैसे दिले होते. या पुरस्काराचे त्याच्याकडे जवळपास १३ कोटी रुपये जमा झाले होते. आणि आजही त्याची चर्चा होताना दिसते. कॉमनवेल्थ गेम आणि ऑलम्पिकच्या होणाऱ्या चर्चेपेक्षा आपल्या देशात वर्षभर फक्त क्रिकेटची चर्चा होताना दिसते.

राष्ट्रीय खेळ नसला तरीही लोक याला आपला राष्ट्रीय खेळच समजतात. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक तरुण याकडे आकर्षित होतात. कारण सध्या आयपीएलमुळे कोणत्या खेळाडूच नशीब केव्हा चमकेल हे कुणी सांगू शकत नाही. म्हणेजच आयपील हि नवीन खेळाडूंसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.

कारण देशाकडून न खेळातही आयपीलमधून त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होतात. मात्र हि गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात नसते. काहींनी चांगली कामगिरी करूनही कुणाची नगर त्यांच्यावर पडत नाही, त्यानंतर त्यांना आपलं आयुष्य जगण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागतो.

म्हणून आज आपण अशाच एका खेळाडू बद्दल जाणून घेणार आहोत. २०१७ मध्ये मेरठमध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील सामन्यात उत्तर प्रदेशकडून खेळताना राजा बाबू नावाच्या खेळाडूने २० चेंडूत ६७ धावा कुटल्या होत्या.

त्या खेळीमुळे राजाबाबूच्या फलंदाजीचं कौतुक होऊ लागलं होतं. त्याच्या फलंदाजीवर प्रभावित होऊन एका व्यावसायिकाने त्याला ई रिक्षा भेट दिली होती. तेव्हा ई रिक्षा आपल्या उदरनिर्वाहाचं साधन ठरेल असं त्याला वाटलंही नव्हतं. मात्र आता गेल्या दोन वर्षांपासून राजा बाबू गाझियाबादमध्ये ई-रिक्षा चालवत आहे.

राजा बाबू सांगतो की, को’रोना वि’षाणूमुळे आलेल्या साथीमुळे त्याची कारकीर्द आणि जीवन सारं काही बदलून गेलं. आता चार जणांचं कुटुंब सांभाळण्यासाठी आपल्याला रोज रस्त्यांवर येऊन मेहनत करावी लागते, असे त्याने सांगितले.

क्रिकेट खेळतानासुद्धा बाबूला इकडची तिकडची कामं करावी लागत होती. कधी कधी उत्पन्न वाढवण्यासाठी ई रिक्षासुद्धा चालवली. मात्र २०२० मध्ये खरी परीक्षा सुरू झाली. उत्तर प्रदेशमध्ये दिव्यांग क्रिकेटपटूसाठी तयार झालेली चॅरिटेबल संस्थास दिव्यांग क्रिकेट संघटना भंग करण्यात आली. त्यानंतर राजा बाबूच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत बंद पडला. त्यानंतर राजा बाबूने काही काळ गाझियाबादमध्ये दूध विकले. तसेच संधी मिळाली तेव्हा ई-रिक्षा चालवली.

डीसीए ही उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेशी संलग्न नव्हते. शर्मा यांनी सांगितले की, आम्ही काही स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने एक संघटना चालवली. स्पर्धेदरम्यान, ट्रान्सपोर्ट आणि खाण्याचा खर्च भागवला जात असे. डीसीएला बीसीसीआयची संलग्नता नव्हती. तसेच यूपीसीएचीही संलग्नता नव्हती. त्यामुळे खेळाडूंचा उत्पन्न निश्चित नव्हतं. मॅन ऑफ द मॅच सामन्यातून जे पैसे मिळतात तेच त्यांचं उत्पन्न असायचं.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.