धक्कादायक! बॉलीवूडवर कोसळला दुःखाचा डोंगर! सलमान खानच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन.

बॉलीवूडमध्ये सध्या सगळीकडेच आनंदाचे वातावरण बघितलं जात आहे. बॉलीवूड बऱ्याच काळापासून एका सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. आणि शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने ती प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. पठाण चित्रपटाने गडगंज कमाई केली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा संपत चाललेल्या बॉलीवूडमध्ये नवीन चेतना बघितली जात आहे. त्यातच नुकतंच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे काही दुःखद बातम्या समोर येतच आहेत.
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे नि’धन झाले आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी राखीचे सांत्वन केले. त्यातच आता अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या जवळच्या एका खास व्यक्तीचे नि’धन झाले आहे. समोर आलेल्या माहिती नुसार, बॉलिवूडमधील आणखी एका प्रसिद्ध निर्मात्याचे निध’न झाले आहे.
ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा ‘ध’क्का बसला आहे. सलमान खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर 2001 मध्ये आलेल्या ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ या बॉलिवूड चित्रपटाची नाझिम हसन रिझवी यांनी निर्मती केली होती. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नझीम यांचे नि’धन झाले.
एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, नाझिम हसन रिझवी यांना काही अज्ञात आ’जारांमुळे अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा रिझवी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
रिझवी यांनी मजबूर लाडकी, आपकल, अंगरवाडी, अंडरट्रायल, चोरी-चोरी चुपके-चुपके, हॅलो, हम लल्लन बोल रहे हैं सारख्या चित्रपटाची त्यांनी निर्मती केली आहे. दरम्यान, चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाची निर्माती अंडरवर्ल्ड च्या पैशानी करण्यात आली, असा खुलासा अभिनेत्री प्रीती झिंटाने केला होता.
तेव्हापासूनच नाझिम हसन रिझवी यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या कारणांमुळे त्यांना पोलीस चौकशीला देखील सामोरे जावं लागलं. आणि याच कारणामुळे बॉलीवूडमध्ये बराच काळ काम करून देखील, ते प्रकाशझोतात आले नाही. बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.