धक्कादायक ! बॉलिवूड हादरलं ! अन्नू कपूर यांची प्रकृती गंभीर झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, कोणत्याही क्षणी

अलीकडच्या काळात सर्वच फिटनेसच्या बाबतीत बऱ्यापैकी जागरुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसाधारण लोक देखील जिम मध्ये जाऊन घाम गाळत आणि आपल्या डायट मध्ये हेल्दी चेंजेस करत फिटनेस मिळवत आहेत. आजच्या धावपळीच्या जगात फिटनेस महत्त्वाचा मुद्दा आहे.
तर जिथे फिटनेसचा मुद्दा येतो तिथे बॉलीवूड स्टार्स चे नाव नक्कीच येते. सुरुवातीपासूनच अनेक बॉलीवूड स्टार्स आपल्या फिटनेस साठी ओळखले जातात. असं असलं तरीही अलीकडे अनेक सेलिब्रिटीना कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधीमुळेच आपला जीव गमवावा लागला आहे.
जिम करत असताना हार्ट अटॅक येणे, ही तर आता जणू काही खूपच साधारण बाब बनली आहे. तीन महिन्यांपूर्वी राजू श्रीवास्तव यांना देखील जिम करत असतानाच अटॅक आला. कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर देखील त्यांना वाचवता नाही आले. या बातमीतून बॉलिवूड सावरत असतानाच आता पुन्हा एक मोठी बातमी येऊन धडकली आहे.
लोकप्रिय अभिनेते अन्नू कपूर यांना गुरुवारी म्हणजेच 26 जानेवारीला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्नू सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नू कपूर यांना छातीत त्रास झाल्यामुळे दाखल करण्यात आल्याचे सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुशांत वट्टल उपचार करत आहेत. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृती सुधारत आहे. आता ही बातमी ऐकल्यानंतर अन्नूचे चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अन्नू कपूरचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी भोपाळमध्ये झाला. त्यांचे खरे नाव अनिल कपूर होते.
मात्र, वडिलांच्या थिएटर कंपनीत रुजू झाल्यानंतर त्यांचे नाव अन्नू कपूर ठेवण्यात आले. अभिनेता असण्यासोबतच अन्नू एक गायक, टीव्ही होस्ट आणि रेडिओ जॉकी देखील आहे. आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपट तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
अन्नूच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख ‘उत्सव’ चित्रपटातून मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अन्नूने ‘तेजाब’, ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘सात खून माफ’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.