‘द कपिल शर्मा’ ‘शो’ मधील चंदू चायवाल्याची लागली ‘लॉ’टरी’, बॉलिवूड मधून लवकरच दिसणार या भूमिकेतुन…

‘द कपिल शर्मा’ ‘शो’ मधील चंदू चायवाल्याची लागली ‘लॉ’टरी’, बॉलिवूड मधून लवकरच दिसणार या भूमिकेतुन…

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा’ शो या कार्यक्रमाचा दुसरा भाग सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाच्या शोच्या पहिल्या सिझनप्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला टिआरपी मिळत आहे. या सिझनमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, रोचेल राव यांसारखे पहिल्या सिझनमधील कलाकार तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारखे नवीन कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.

द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. चंदनने चायवाला ही भूमिका अगदी उत्तम रीतीने निभावली आहे. त्याने या भूमिकेत अनेक लोकांना अगदी खळखळून हसवले आहे.

पण आपणास सांगू इच्छितो कि आपला लाडका चंदू चायवाला लवकरचं आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. होय चंदन लवकरचं एका चित्रपटांद्वारे बॉलीवूड मध्ये डेब्यू करणार आहे. आपल्याला माहित असेल कि तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये कपिल शर्माने राजीव ढींग्रा याच्या ऐतिहासिक ‘फिरंगी’ या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात, त्याने पो’लि’स बनण्याची इच्छा असलेल्या एका माणसाची भूमिका केली होती. परंतु प्रत्येक वेळी तो आपले हे स्वप्न पूर्ण करण्यात अयशस्वी होत असतो. पण आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राजीव ढींग्रा लवकरच त्याच्या आगामी चित्रपटामध्ये कपिल शर्माचा जवळचा मित्र चंदन प्रभाकर याला लवकरचं बॉलीवूड मध्ये एका नव्या रूपात का’स्ट करणार आहेत.

होय, मीडिया रिपोर्टनुसार चंदन प्रभाकर राजीव ढींग्रा याच्या पुढच्या चित्रपटात मुख्य ख’ल’नायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. चंदनच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देताना राजीव म्हणाले की चंदन वॉ’टर मा’फि’याची भूमिका साकारणार आहे. जो एक ख’त’रनाक गुं’ड देखील असतो.

चंदनने सुद्धा दिला लगेच होकार :- राजीव म्हणाले कि, चंदनलासुद्धा बर्‍याच काळापासून चित्रपटात एक वेगळी आणि अनोखी व्यक्तिरेखा साकारायची होती आणि हे पात्र त्याला खूप आवडलं. म्हणून त्याने लगेचच या चित्रपटाला होकार दिला. आता लवकरच तो या चित्रपटाच्या शु’टिंगला सुरुवात करणार आहे. तसेच आपल्याला माहित नसेल पण कपिल शर्मा, राजीव ढींग्रा आणि चंदन हे अगदी लहानपणीचे मित्र आहेत.

चंदनने ‘द कपिल शर्मा’ शोच्या आधी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात देखील कपिलसोबत काम केले होते. तसेच त्याने काही पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे. ‘भावनाओ को समझो’ या हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता. पण त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी ‘द कपिल शर्मा’ शोच्या या कार्यक्रमानेच दिली. त्यामुळे चंदनचे फॅन्स त्याला या कार्यक्रमात चांगलेच मिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12