‘द कपिल शर्मा शो’ फेम ‘या’ अभिनेत्यासोबत घडला विचित्र प्रकार! म्हणाला, त्यांनी माझ्या छा’तीवर हात ठेवला आणि जोरात त्यांनी…

‘द कपिल शर्मा शो’ फेम ‘या’ अभिनेत्यासोबत घडला विचित्र प्रकार! म्हणाला, त्यांनी माझ्या छा’तीवर हात ठेवला आणि जोरात त्यांनी…

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, आपण खरोखरच हसायला विसरूनच जातो. मात्र खळखळून हसणे आणि आनंदी राहणे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे. असं असलं तरीही कामाचा ताण, घरातील काही गोष्टींचा त’णाव या सगळ्यांच्या विचारात आज माणूस हसायचं विसरूनच गेला आहे.

अशा वेळी, चला हवा येऊ द्या, द कपिल शर्मा शो, तारक मेहता का उलटा चष्मा, भाभीजी घर पर है सारखे शोज प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतात. त्यामधील कॉमेडी बघून काही क्षण का होईना पण, आपण आपला ताण-त्रास बाजूला ठेवून थोडं शांत होतो. द कपिल शर्मा शो तर माघील कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच काम करत आहे.

हा शो जेव्हा सुरु झाला तेव्हा, या शो ला कसा प्रतिसाद येईल याबद्दल खुद्द कपिल शर्मा आणि मेकर्सला देखील शंका होती. मात्र, शो सुरु झाला आणि त्यामधील सर्वच कलाकारांचे भन्नाट अभिनय, परफेक्ट कॉमेडी टायमिंग, हटके स्टाईल यामुळे शो अगदी सुपरहिट ठरला. शोमध्ये, अनेक पुरुष कलाकारांनी महिलांचे पात्र रेखाटले होते.

त्यापैकीच एक अभिनेता अली असगर देखील होता. बिट्टू म्हणजेच कपिल शर्माच्या दादीची भूमिका अली असगरने साकारली होती. स्टेजवर त्याची एंट्री होताच, टाळ्यांचा गडगडाट होत असे. अली असगर टेलिव्हिजन मध्ये माघील कित्येक वर्षांपासुन काम करत आहे. त्यादरम्यान त्याने, कहानी घर घर की, कुटुंब, अशा अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते.

त्याचबरोबर अनेक सिनेमामध्ये देखील तो झळकला होता. मात्र बिट्टू उर्फ कपिलची दादी म्हणून त्याच्या अभिनयाची विशेष दखल घेण्यात आली. मात्र, एक पुरुष असून महिला पात्र रेखाटने सोपे नाहीये. आणि अली असगरने तर कित्येक वर्ष ते पात्र रेखाटले. त्यादरम्यान त्याला काही विचित्र परिस्थितींचा देखील सामना करावा लागला होता.

एका मुलाखतीमध्ये त्याबद्दल बोलताना अली म्हणाला होता की, ‘कपिल शर्मा शोमधून मला दादी या भूमिकेत खूप जास्त प्रेम मिळाले. मी कधी विचार देखील केला नव्हता, इतके जास्त माझं अभिनयाचे कौतुक केले गेलं. मात्र त्यानंतर मला अनेक शोमधून त्याचप्रकारच्या भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या.

मला असं वाटू लागलं होत की, आता मला मेल कॅरॅक्टरची भूमिका मिळणारच नाही. त्यादरम्यान काही गं’भीर प्रकार देखील माझ्या सोबत घडले.’ एका कार्यक्रमादरम्यान अली असगर दादी बनून स्टेजवर गेला, त्याचदरम्यान विनयभं’गाचा सामना त्याला करावा लागला.

त्याबद्दल सांगताना पुढे अली म्हणाला की, ‘स्टेजवर गेलो तोच, अनेकजण माझ्यावर तु’टून पडले. त्यापैकी काहींनी माझ्या छा’तीला चि’मटे घेतले, आणि नको ते काम करू लागले. त्यावेळी मी खूप हतबल झालो होतो आणि काय करावं हेच मला समजत नव्हतं. आमच्या क्रृ मधील एक महिला मेम्बर आली आणि तिने मला वाचवले.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.