दोनच महिन्यात संसार मोडल्यानंतर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय ‘या’ मराठमोळ्या तरुणाशी लग्न, किस करताना फोटो केले शेअर…

सेलिब्रिटींची लाईफस्टाईल कायमच गुंतागुंतीची ठरते. मग तो सेलिब्रिटी बॉलीवूड, हॉलिवूडचा असेल किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अनेक वेळा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असं काही घडतं की, त्यामुळे त्यांना टिकेचा सामना देखील करावा लागतो.
परंतु हे सेलिब्रेटी या सर्व गोष्टींची परवा करत नाहीत. अनेक सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यात असणाऱ्या नात्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील तर अनेक सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चव्हाट्यावर आल्या आहेत. अशाच काही सेलेब्रिटींपैकी एक अभिनेत्री सारा खान देखील आहे.
सारा खान आजकाल तिच्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे. सारा ‘1990’ या चित्रपटातून पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिद काझमी करत आहेत. या चित्रपटात सारा खानसोबत अर्जुन मन्हास आणि मीर सरवर यांचा अभिनय देखील पाहायला मिळणार आहे. ‘बिदाई’ या मालिकेतून सारा खानने मनोरंजनसृष्टीमधे पदार्पण केले.
मात्र सारा कायमच आपल्या प्रोफेशनल सोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आणि आता तिच्या पर्सनल लाइफशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती तिचा प्रियकर शंतनू राजेसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. शंतनू राजे हे व्यवसायाने पायलट असून एका रेस्टॉरंटचे मालक आहेत.
सारा खान दुस-यांदा नवरी बनणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये तिने ‘बिग बॉस 4’ च्या घरात स्पर्धक अली मर्चंटसोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न फक्त दोन महिने टिकले. घरातून बाहेर पडल्यानंतर सारा-अली मर्चंटचा घटस्फोट झाला. तर, अभिनेत्री बॉयफ्रेंड शंतनू राजे याला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे.
सारा खान शंतनूवर, अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसते. आणि आता साराने शंतनूसोबतच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार आहे. अभिनेत्रीने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की ती या वर्षी तिचे नाते पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार करत आहे.
तिचा प्रियकर शंतनू राजे याच्यासोबत ती यावर्षी लग्न करणार आहे. पण नेमकं कधी याची तारीख तिने सांगितली नाहीये. तूर्तास तरी आपण सध्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. सारा पुढे म्हणाली- माझे कुटुंब आधी या नात्यावर खूश नव्हते, पण आता आम्ही दोघांनी आमच्या पालकांना लग्नासाठी तैयार केलं आहे.