‘देवमाणूस-२’ मधील अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा, पहा रिअल लाईफमध्ये दिसते खूपच ग्लॅमरस…

‘देवमाणूस-२’ मधील अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा, पहा रिअल लाईफमध्ये दिसते खूपच ग्लॅमरस…

सस्पेन्स आणि थरार यांचे संमिश्रण असलेली मराठी मालिका देवमाणूस अत्यंत लोकप्रिय ठरली. उत्तम आणि रोमांचक कथानक, थरार आणि सोबतीला कलाकारांचा उत्तम अभिनय म्हणून देवमाणूस मालिका कायमच प्रसिद्धीच्या शिखरवरच राहिली. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या पर्वाने मराठी मालिका विश्वामध्ये नवीन विक्रम केले.

या मालिकेतील सर्वच पात्र देखील तेवढेच लोकप्रिय ठरले. काही काळानंतर मालिकेचे कथानक थोडे रटाळवाणे होऊ लागल्याचे मेकर्सच्या ध्यानात येताच, त्यांनी मालिकेमध्ये काही काळाचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. देवमाणूसचे पहिले पर्व संपले तेव्हा अनेकांना निराशा झाली होती. मालिकेचा शेवट पाहिजे तसा नाही, यामुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले होते.

मात्र, त्यामुळेच तर देवमाणूसच्या दुसऱ्या पर्वाची ओढ प्रेक्षकांना लागलेलीच होती. मालिकेमध्ये कोणते नवीन पात्र येणार याकडे खास करून प्रेक्षकांची लक्ष लागले होते. चांगुलपणाचा मुखवटा ओढणारा डॉक्टर सुंदर आणि श्रीमंत महिलांना आपल्या प्रेमाच्या जा’ळ्यात ओ’ढतो आणि त्यांना फस’वतो. अशा कथानकावर आधारित या मालिकेत सुरुवातीपासूनच ग्लॅमर बघायला मिळाले.

या मालिकेत खास महिलांच्या भूमिकेत अनेक सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री बघायला मिळाल्या. आणि आता त्यात अजून एका अभिनेत्रीची भर पडणार आहे. मालिकेमध्ये सोनाली उर्फ सोनू हे पात्र नवीन ट्विट्स घेऊन येत आहे. या सोनालीचे पात्र रेखाटणाऱ्या अभिनेत्रीचे सौंदर्य बघून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

सोनालीने आपल्या सौंदर्याने मालिकेत सगळ्यांना वेड लावलेच आहे. मात्र खऱ्या आयुष्यात देखील आता तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने सोनालीची भूमिका साकारली आहे. प्रोमोमध्ये बघायला मिळते की, सोनाली डॉक्टरकडे येते.

काही चर्चा झाल्यानंतर जेव्हा ती डॉक्टरच्या क्लिनिक मधून बाहेर जाऊ लागते, तेव्हा डॉक्टर तिच्याकडे येतो आणि तिचे नाव विचारतो. ‘माझं नाव सोनाली, पण लाडाने सगळे मला सोनू म्हणतात. मी तुम्हाला काय म्हणू?’ असा प्रश्न ती विचारते. डॉक्टर काही बोलणार तोच सोनाली म्हणते,’मी तुम्हाला डॉक्टर अंकलच म्हणेल.’

तिच्या या उत्तरावर डिम्पल हसू लागते, पण डॉक्टर मात्र चांगलाच परेशान होतो. सोनाली मला डॉक्टर अंकल का म्हणाली या विचाराने डॉक्टरची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. सोनालीच्या भूमिकेत वैष्णवी खूप जास्त आकर्षक दिसत आहे. देवमाणूस मालिकेतून वैष्णवी अभिनय क्षेत्रात प्रवेश करत आहे. पण असं असलं तरीही, वैष्णवीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

इंस्टाग्राम वर तिचे खूप सारे फोटोज आहेत. यामध्ये अनेक फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. वैष्णवीने मार्केटिंग मध्ये एमबीए केले आहे. ती फिटनेस कोच म्हणून देखील काम करते. युट्युबवर धर्मा एन्टरटेन्टमेंटच्या ‘शाळा प्रत्येकाच्या आठवणीतली’ या मिनी सिरीजमध्ये ती झळकली होती. देवमाणूस मालिकेत तिला बघण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.