‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने कुणाला न सांगताच गुपचूप उरकवला ‘साखरपुडा’, अचानक फोटो झाले वायरल…

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने कुणाला न सांगताच गुपचूप उरकवला ‘साखरपुडा’, अचानक फोटो झाले वायरल…

टीव्हीवरील काही मालिका अशा असतात ज्या प्रेक्षकांना कायम लक्षात राहतात. त्या मालिकेमधील पात्र, डायलॉग मालिका संपल्यानंतरही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळातात. अशीच झी मराठी वाहिनीवरील एक मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

पण नुकताच या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा झाला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सतत गोंधळलेले पात्र म्हणजे अ‍ॅना उर्फ पूजा ठोंबरे. पूजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. पूजाने १४ डिसेंबर रोजी कुणाल अहिररावसोबत साखरपुडा केला.

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटकवर साखरपुड्याचा फोटो शेअर करत आरती वडगबाळकरचे आभार मानले आहेत. या मालिकेत उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणारी अ‍ॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली होती. त्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून रसिकांच्या भेटीला आली होती.

लवकरचं बांधणार लग्न गाठ आहे :- पूजा ठोंबरे हिचा नुकताच १४ डिसेंबरला अगदी छुप्या पद्धतीने नाशिक येथील नामपूर येथे कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला होता. तसेच पूजा व कुणाल हीचे साखरपुड्यातील कपडे अभिनेत्री आरती वबडगावकर हिने डिझाईन केलेले होते. आता ही माहिती त्या दोघांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर दिली आहे.

हा सोहळा काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कौटुंबिक पद्धतीने पार पडला. यावेळी आरती मात्र खुपच सुंदर दिसत होती. पूजाने तिच्या साखरपूड्याचा सोहळा अतिशय खासगी पद्धतीने आयोजित केला होता. तिने जवळच्या मित्रमैत्रीणींना आणि कुटुंबीयांना आमंत्रण दिले होते. आता त्या दोघांच्या फोटोवर इंस्टाग्रामवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे.

आता हे दोघं लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. पूजा ही मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. तसेच तिने केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे.

तिने शालेय जीवनापासून ते आतापर्यंत अगणित पुरस्कार पटकावले आहेत. ई टीव्ही, झी मराठी तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून अभिनय व नृत्याचे कसब पणाला लावत मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत तिने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

पण दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने पूजाला घराघरात ओळख मिळवून दिली आहे आणि ती रातोरात प्रकाश झोतात आली. तसेच या मालिकेनंतर ती सुबक निर्मित ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात झळकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12