त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा १२ वर्षाची होती ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको…वयात एवढा फरक असूनही….

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेता आहेत, ज्यांच्या पत्नी बॉलीवूडच्या बाहेरील अर्थात कलाकार नाहीये. शाहरुख-गौरी, अनिल कपूर-सुनीता कपूर, जॉन अब्राहम-प्रिया मुंचल, शाहिद कपूर-मीरा राजपूत असे अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील.
या बॉलीवूड अभिनेत्यांच्या पत्नी कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नसल्या तरी ग्लॅमर आणि बोल्ड लुकच्या बाबतीत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना देखील माघे टाकतात. मीरा राजपूत देखील त्यापैकीच एक आहे. मीरा राजपूत आपल्या लाईफस्टाईल, ग्लॅमर आणि फॅशन साठी कायमच चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि क्लासी लुकपुढे भल्याभल्या अभिनेत्री देखील फिक्या पडतात.
सोशल मीडियावर देखील ती कमालीची सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे. ती आपल्या सोशल मीडियावरून वेगवगेळ्या पोस्टद्वारे आणि तिच्या फोटोंमुळे नेहमीच बातम्यांमध्ये असते. तिच्या फॅशन आणि लाईफस्टाईलने अनेकांना फॅशन-गोल्स दिले आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत.
7 जुलै 2015 रोजी त्यांनी गुडगावमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केलं. मीरा वयाने शाहिदपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. पण १३ वर्षांनी शाहिद मोठा वाटत असला तरी त्याच्या लूकवर वयाचा अंदाज लावता येत नाही. म्हणूनच त्याला बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून संबोधतात.
शाहिद कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार्सपैकी एक आहे. तसं पाहिलं तर शाहिदला कुटुंबातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. शाहिदचे वडिल पंकज कपूर बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार आहेत, तर शाहिदची आई नीलिमा अजीम बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या.
शाहिद कपूरने चॉकलेट बॉयच्या रुपात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले पाय भक्कम रोवले आहेत. आपल्या अनेक चित्रपटात त्याने आव्हात्मक भूमिका साकारल्या आहेत. उत्तम अभिनय करत असला तरी शाहिदच्या करियरला कलाटणी मिळाली ती कबीर सिंह या चित्रपटामुळे.
या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्द करून दाखवले. त्यामुळे शाहिद पुन्हा एकदा तरुणांचा फेव्हरेट बनला. सध्या शाहीत त्याचे वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदात जगत आहे आणि तो दोन मुलांचा पिता देखील झाला आहे. शाहिदने मीरा राजूपतसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे शाहिद मीरा राजपूतपेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठा आहे.
सोशल मीडियावर मीरा राजपूतचा एक फोटो व्हायरल होत असून हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहिदचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मीरा राजपूत साधारणत: 12 ते 13 वर्षांची होती, हा तेव्हाचा फोटो आहे.
या फोटोत मीरा खूपच गोड दिसत असून तिच्या फोटोवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वयाच्या 21 वर्षी मीराने शाहिद कपूरबरोबर विवाह केला. शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल म्हणूनही प्रसिद्ध आहे.