तुषार कपूरने उलगडल स्वतःच लैंगिक गुपीत, म्हणाला मी आयुष्यभर राहणार अविवाहित, कारण माझा…

तुषार कपूरने उलगडल स्वतःच लैंगिक गुपीत, म्हणाला मी आयुष्यभर राहणार अविवाहित, कारण माझा…

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा आणि महत्वपूर्ण टप्पा समजला जातो, मग तो कोण्या मोठ्या स्टारच्या आयुष्यातील असेल किंवा सर्व साधारण व्यक्तीच्या आयुष्यातील. लग्न झाले कि, आयुष्यात स्थैर्य येते असे सगळीकडेच समजले जाते. आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी आता एका जोडीदार भेटला आणि तो नेहमीच आपल्या सोबत असेल त्यामुळे साहजिकच कोणालाही मानसिक शांती मिळते.

त्यामुळे केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये लग्न हा खूपच महत्वाचा टप्पा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात समजला जातो. मात्र बऱ्याच वेळा, सर्वच विवाह यशस्वी होतात असे नाहीये. नात्यामध्ये, येणारा अविश्वास आणि इतर कलह यामुळे अनेक वेळा लग्न तुटतात. आणि जेव्हा मनातून बांधलेलं नाते तुटतात तेव्हा व्यक्तीवर खूप जास्त आ’घात होतात, तो आपले सर्वस्व गमावून बसलेला असल्यामुळे दुःखी होतो.

त्यामुळे, आता विचहाच्या बाबतीत समीकरणं बदलेली आपल्यला बघायला मिळत आहेत. आता आयुष्यभर साथ निभावण्यासाठी जोडीदार असायलाच हवा, याबद्दल काही बदल घडत आहेत. आता अनेकजण विवाहाच्या बंधनात अडकणे टाळतात. बॉलीवूड मध्ये आपण हे खूप पूर्वी पासून पाहिले आहे.

असेच काही आपल्याला जितेंद्र कपूर यांच्या मुलांबद्दल देखील झाले आहे. एकता आणि तुषार कपूर या दोघांनीही अजून पर्यंत विवाह केला नाहीये. आता तुषार कपूरने, आपला विवाह न करण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. मला स्वतःला इतर कोणासोबत देखील वाटायचे नाहीये आणि त्यामुळे मला विवाहच करायचा नाहीये असे तुषार बोलला आहे.

‘मुझे कुछ केहना है’ या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा तुषार कायमच चर्चेचा विषय ठरला. आपल्या पहिल्या मुव्ही मध्ये त्याला चांगलेच यश मिळाले असले तरीही त्यानंतर इतर कोणत्याही सिनेमामध्ये तो कमाल नाही करू शकला. गोलमाल मध्ये त्याने मूक व्यक्तीची भूमिका निभावली आणि त्याने त्याला एक नवीन ओळख मिळाली.

प्रत्येक गोलमालच्या भागात त्याचे पात्र, सर्वच प्रेक्षकांना खळखळून हसवते. सुरुवातीपासूनच त्याचे कोणत्याही अभिनेत्रींसोबत किंवा मॉडेल सोबत अफेअर किंवा नात्याच्या बातम्या आल्या नाही. म्हणून तो नक्की कोणासोबत विवाह करणार, याबद्दलची चर्चा वारंवार रंगत होतीच. त्यातच, त्याने सिंगल पॅरेन्ट बनण्याचा निर्णय घेतला आणि सर्वच च’कित झाले.

नक्की कोणत्या कारणामुळे आपण विवाह करणार नाही याबद्दल त्याने आता सांगितले आहे. “मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो” असं तुषार म्हणतो. पुढे तो सांगतो, “मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो.

याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वतःला इतरांसोबत शेअर करु शकत नाही. त्यामुळे भविष्यातही मी तसं करणार नाही. जर शेवट चांगला, तर सगळंच चांगल. पेरेंटिंग म्हणजे फक्त डायपर बदलणं नाही, तर निस्वार्थ प्रेम, पालनपोषण आणि मुलांना बिनशर्त पाठिंबा देणं असतं” ४४ वर्षांच्या तुषारने २०१६ मध्ये सरोगसी च्या माध्यमातून वडील बनला.

त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे आणि तो आत पाच वर्षांचा आहे. तुषारची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही २०१९ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12