‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘वहिनीसाहेब’ झाल्या ‘आईसाहेब’.. पोस्ट शेअर करत दिली ‘ही’ गोड बातमी…

आपल्याला माहित असेल कि मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची ख’लनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या ह’टके स्टाईलमुळे लोकप्रि’य झाले होते.
मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तु रुं’गा’त रवानगी झाली होती. पण ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. पण त्यामागे कारण देखील तितकेच गोड होते, कारण आपणा सर्वांच्या लाडक्या वाहिनीसाहेबाच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन होणार होते.
नंदिता वहिनी ही महत्त्वाची भूमिका अभिनेत्री धनश्री काडगांवकरने साकारली होती आणि या पात्राने तिने सर्वांच्याच मनाला भुरळ घातली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र नंदिता वहिनींच्या अभिनयाची आणि त्यांच्या स्टाइलची प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा रंगली.
पण आता मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या आणि काही दमदार भूमिकांच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या जीवनातील आता एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. कारण धनश्री काडगांवकर हिच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे.
कालच तिने एका गों’डस बाळाला ज’न्म दिला आहे आणि आपल्या सोशल मीडियातील इंस्टाग्राम अकाऊंटवरुन धनश्री काडगांवकर हिने ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. आपण एका बाळाला ज’न्म दिल्याची बातमी धनश्रीने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये धनश्रीने म्हटलं, “आम्हाला आपल्यास सांगण्यास खूपच आनंद होत आहे की आज सकाळी बाळाला जन्म दिला. मी आणि बाळ आम्ही दोघेही सुखरुप आणि सुदृढ आहोत. तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार.
धनश्री काडगांवकर ही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका करत होती. आपण ग रो’दर असल्याची गुड न्यूज सुद्धा धनश्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन दिली होती. त्यानंतर आता गोंडस बाळाला जन्म दिल्याची बातमीही तिने इंस्टाग्रामवरुन दिली आहे.
ग रो’दर असल्यामुळे धनश्री शू’टिं’गपासून दूरच होती. गेल्या महिन्यात धनश्रीचे बेबी शॉवर करण्यात आले होते. याचे फोटोजही धनश्रीने सोशल मीडियात पोस्ट केले होते. या फोटोजमध्ये धनश्री आपला पती दुर्वेश देशमुख याच्यासोबत दिसत असून ती खूपच आनंदीही असल्याचं पहायला मिळालं होतं.
आ’ईच्या आग्रहामुळे रिअलिटी शोमध्ये झाली सहभागी:- झी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअलिटी शोमधून धनश्री घराघरांत पोहोचली. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्याचा धनश्रीची विचार नव्हता. पण आ’ईच्या आग्रहामुळे ती या शोमध्ये सहभागी झाली आणि 24 स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर धनश्री या शोच्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये पोहोचली.
धनश्रीच्या मालिका:- महाराष्ट्राचा सुपरस्टार मुळे धनश्रीला माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून जन्मगाठ’ या मालिकांमध्ये झळकली. धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.