‘तुझे तसले व्हिडियो पाठव, मी तुला..’ चाहत्याने मराठी अभिनेत्रीकडे केली असली मागणी! स्क्रिनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली..

अनेक लोक सोशल मीडियावर असणाऱ्या व्हिडियोज आणि फोटोज वरुन मुलींना आणि अभिनेत्रींबद्दल आपलं मतं बनवतात आणि त्यांना नको तसे कमेंट करत मा’नसि’क त्रा’स देखील देतात. आजवर असे अनेक प्रकार समोर आले आहेत.
ज्यामध्ये, अनेक अभिनेत्री आणि मुलींना सोशल मीडियावर अतिशय खराब भाषेत टीकेचा सामना करावा लागला आहे. याच्याही पुढे जाऊन काहींनी डायरेक्ट मॅसेज करत त्याच्याकडे अ’नै’तिक मागणी केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. आणि आता एका मराठी अभिनेत्रींच्या बाबतीत देखील असंच काहीस घडलं आहे.
तिने स्वतः सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर अनेकांना मोठा ध’क्का बसला आहे. खरं तर, आजच्या काळात अभिनेत्रींना तर अशा प्रकारांना खूप जास्त सामोरे जावं लागते. एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत त्यांनी जी भूमिका साकारली आहे त्यावरून अनेकजण त्यांच्याबद्दल आपले मत बनवतात.
अनेकवेळा तर त्याच भूमिका त्यांच्याशी एकरूप आहे, असा समज अनेकांचा होतात. आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हि मंडळी त्या अभिनेत्रींकडे नको ती मागणी करतात. मात्र, यामुळे समोरच्या व्यक्तीला किती जास्त मा’नसिक त्रास होतो?
याबद्दलचा विचार हे लोक करत नाहीत. अशा लोकांनी केलेले कमेंट किंवा मॅसेज यावर साधं उत्तर म्हणजे त्यांना आपल्या प्रोफाईल मधून ब्लॉक करणे, असं करून अनेक मुली आणि अभिनेत्री अशा समाजकंटकाकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यांना उत्तर न दिल्यास त्यांची हिंमत अधिक वाढते. आणि मग दुसऱ्या अकाउंट वरून परत ते असे कमेंट करतात.
त्यामुळे, आता या मराठी अभिनेत्रीने अशा लोकांना उत्तर देण्याचे ठरवत तिला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला तिने सगळ्यांसमोर आणलं आहे. चंद्रमुखी चित्रपटात मीरा जोंधळेंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी भावेने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. सुरभी सध्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत सानियाच्या आईची भूमिका साकारत आहे.
सुरभीने तिला अ’श्ली’ल व्हिडिओ पाठवणाऱ्याची पोलखोल करत त्यांच्यातील संभाषणाचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आणि लिहिलं, ‘ह्यांनी मला अनेकवेळा अ’श्ली’ल विडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केले पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला, जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे. त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झोंबल ते.
अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते, तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक ना’ग’डा केले जाईल ह्याची नोंद घ्यावी. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही.’
दरम्यान या व्यक्तीने सुरभीकडे थेट से’क्सी व्हिडियो पाठवण्याची मागणी केल्याचे तिने शेअर केलेल्या पोस्टवरुन समजते. सुरभीने अशी मागणी करणाऱ्याच्या विरोधात सायबर सेलमध्ये गु’न्हा नोंदवला आहे. तर सोशल मीडियावर अनेकांनी सुरभीला पाठिंबा देत, तू जे केलं ते अगदी योग्य आहे असं मत व्यक्त केलं आहे.