‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील ‘भिडे’ मास्तरने धरला गावाकडील ‘रस्ता’, व्हिडियो शेयर करत सांगितले हे कारण…

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील ‘भिडे’ मास्तरने धरला गावाकडील ‘रस्ता’, व्हिडियो शेयर करत सांगितले हे कारण…

भ’टकंती कुणाला नाही आवडत. आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला खूप आवडतं असतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. पण या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडत असते.

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. पण आता गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी म्हणजेच तारक मेहता का उल्टा चश्मा मधील भिडे मास्तरांनीही कामातून ब्रे’क घेऊन आता आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

भिडे दादा अर्थात अभिनेता मंदार चांदवडकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपल्या भावाच्या शेतामधून त्याने हा व्हिडीओ केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ शेअर करताना मंदार लिहितो कि, ”मी आलोय माझ्या मूळगावी नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे आणि मी इथे येऊन खूप प्रसन्न झालो आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत तो सध्या नाशिकमध्ये फिरायला आला आहे. मुंबईच्या ध’काध’कीच्या जीवनापासून लांब इथे शांत वाटत असल्याची भावनाही त्यानं व्यक्त केली आहे.

सर्वाधिक लोकप्रि’य आणि मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छा’प सोडली आहे आणि गोकूळधामचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर.

आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेतून गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मंदार हे मे’कॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी अभिनयात करिअर करण्यासाठी दुबईतील गलेल’ठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम केला होता. मंदार यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. मी २००८ पर्यंत खूप सं’घ’र्ष केला.

दु’बईत मे’कॅनिकल इंजीनिअर म्हणून काम करत होतो. तेथील नोकरी सोडून मी भारतात परतलो. कारण मला अभिनयात करिअर करायचे होते. मला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती. बऱ्याच नाटकांमध्ये मी काम केले पण मनासारखी भूमिका मला मिळाली नाही. अखेर मला २००८ मध्ये ‘तारक मेहता’ची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

माझे संपूर्ण आयुष्यच ‘तारक मेहता..’ मालिकेत काम केल्यापासून बदलले. ज्या मालिकेत मी काम करत आहे, ती एवढी लोकप्रि’य होईल याचा विचारसुद्धा केला नव्हता. लोक सहसा मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याचे स्वप्न पाहतात. पण मोठमोठे सेलिब्रिटीच ‘तारक मेहता..’च्या मालिकेत आले. जेव्हा आमच्या मालिकेत अमिताभ बच्चन आले तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता. बिग बींसोबतच शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार हेसुद्धा सेटवर आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12