‘तारक मेहता’मध्ये नट्टू काका गेल्यामुळे आता ‘ही’ व्यक्ती घेणार नट्टू काकांची जागा! पहा फोटो..

तारक मेहता का उलटा चष्मा ही आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. माघील जवळपास पंधरा वर्षांपासून, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. इतक्या वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर, जगभरात या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.
ही मालिका जितकी जास्त यशस्वी ठरली, तेवढेच जास्त या मालिकेचे पात्र देखील लोकप्रिय ठरले. जेठालाल, दयाबेन, बापूजी आणि टपु यांच्या अवती-भोवती या मालिकेचे कथानक असते. मात्र असे असले तरीही, मालिकेतील इतर पात्रांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. तारक मेहता, भिडे गुरुजी, भिडे भाभी, अंजली भाभी, बबिता, अय्यर इ सर्वच पात्रांना देखील भरगोस लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.
त्याचबरोबर, जेठालालच्या दुकानातील पात्र म्हणेजच, नट्टू काका आणि बग्गा या पात्रांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. जेठालालचे दुकान दाखवले की, नट्टू काका शिवाय ते अपूर्णच वाटते. माघील बऱ्याच काळापासून, नट्टू काका मालिकेमध्ये दिसत नव्हते. नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचा दीर्घ आ’जारानंतर नि’धन झाले.
तारक मेहताच्या मालिकेमध्ये त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरीही, शो मस्ट गो ऑन. अर्थात काम तर केलेच पाहिजेच ना. म्हणून आता नट्टू काकांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड शोच्या मेकर्स कडून करण्यात आली आहे.
त्यामुळे आता ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून लवकरच एक प्रसिद्ध अभिनेता ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. घनश्याम नायक हे या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय पात्रांपैकी एक नट्टू काका हे पात्र साकारत होते.
त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या बळावर ही भूमिका अतिशय लोकप्रिय केली होती. त्यामुळे नट्टू काका हे पात्र प्रेक्षकांचे अत्यंत आवडते पात्र झाले होते. घनश्याम नायक यांच्या नि’धनानंतर आता त्यांच्या इतकी ताकदीने ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.
या भूमिकेसाठी अनेक कलाकारांचे नाव समोर आले होते. मात्र खात्रीशीर माहिती कोणाकडेच नव्हती. आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी स्वतः नव्या नट्टू काकांची प्रेक्षकांना भेट घडवून दिली आहे. नुकतंच असित मोदी यांनी ‘तारक मेहता’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर केली आहे.
‘आता हे नट्टू काका तुमच्या भेटीला येणार आहेत. आशा आहे की, तुम्ही घनश्याम यांना दिलेत तेवढंच प्रेम यांनाही द्याल,’ अशी पोस्ट करत मोदी यांनी एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये असित मोदींसह नवीन नट्टू काका दिसत आहेत. मात्र त्यांच्या नावाचा खुलासा अजून देखील मेकर्सने केला नाहीये.
‘तारक मेहता’ मधील अनेक जोडींप्रमाणेच बागा आणि नट्टू काकाची जोडी देखील प्रसिद्ध झाली होती. घनश्याम यांच्या निधनानंतर प्रेक्षक या जोडीला मिस करत होते. आता मेकर्स आपल्याकडून नवीन नट्टू काका घेऊन तर आले आहे, मात्र हे नट्टू काका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.
” xmlns:xlink=”https://www.w3.org/1999/xlink”>View this post on Instagram