‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! 14 वर्षांनंतर ‘या’ बड्या व्यक्तीने सोडला शो…

‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! 14 वर्षांनंतर ‘या’ बड्या व्यक्तीने सोडला शो…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कॉमेडी शो सर्वांच्याच अगदी आवडीचा शो आहे. या शोमधील जवळपास प्रत्येक कलाकाराने घरोघरी आपला ठसा उमटवला आहे. या शोमधील कलाकारांना लोक ओळखतातच. माघील काही काळात अनेक कलाकार हा शो सोडून गेले आहेत.

विशेष म्हणजे हा शो सोडून गेलेल्या कलाकारांना आज देखील अनेकजण ओळखतात. गेल्या 14 वर्षांपासून या शोने लोकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही देशातील सर्वात जास्त काळ चालणारा कार्यक्रम असून त्याच्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण कथेसोबतच त्यातील प्रत्येक पात्राने चाहत्यांवर जबरदस्त छाप सोडली आहे.

TMKOC च्या कलाकारांचे खरे नाव आता लोक विसरले आहेत, अशी स्थिती झाली आहे. आणि त्यांची ओळख मालिकेतील नावानेच रुजू झाली आहे. दरम्यान, अनेक कलाकार सध्या हा शो सोडताना दिसत आहेत. आधी दयाबेन, टपू, अंजली भाबी त्यानंतर शैलेश लौढा यांनी शोला राम राम केला आहे.

आता मालिकेचे दिग्दर्शकच या मालिकेतून बाहेर पडले आहेत. तारक मेहता मधील कलाकार आधीच शोमधून बाहेर पडत असताना दिग्दर्शकानेच शो सोडल्यामुळे सगळेच चकित झाले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी तब्बल 14 वर्षांनी या मालिकेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मालव राजदा यांनी 15 डिसेंबरला तारक मेहता मालिकेचं शेवटचं शुटिंग केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसदरम्यान काही वाद सुरु होता. या कारणाने मालव राजदा यांनी तडकाफडकी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

मालव राजद यांनी मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी मालिकेचे निर्माचे असित मोदी यांचे आभार मानले आहेत. 14 वर्षांच्या सलग शुटिंगनंतर आपल्या कामात तोच तोच पणा येतो, त्यामुळे आपल्या क्रिएटिव्हीटीला वाव देण्यासाठी वेगळी आव्हान स्विकारण्याची गरज असते त्यामुळे आपण यातून बाहेर पडत असल्याचं मालव राजदा यांनी सांगितलं.

तारक मेहता मालिकेबरोबर आपल्या 14 वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना मालव राजदा यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा प्रवास आयुष्यातील सुखद होता, या मालिकेमुळए मला केवळ प्रसिद्धी आणि पैसाच नाही तर माझी जीवनसाथी देखील मिळाली, असं मालव राजदा यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच टप्पूची भूमिका करणारा राज अनाडकट शोमधून बाहेर पडला होता. तसेच तारक मेहता मधील अतिशय मुख्य कलाकार ज्यांच्या नावावर शो चालतो त्या शैलेश लोढा यांनी देखील शो सोडला होता. आता थेट दिग्दर्शकानेच शो सोडल्यामुळे शोवर काही परिणाम फोटो हे सांगणे कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12