तनिषा मुखर्जीने बहीण ‘काजोल’वर केले गंभीर आरोप ! म्हणाली; काजोलमुळे माझं फिल्मी करियर संपलं, कारण…

काजोल हे बॉलीवूड मधील सर्वात मोठं आणि महत्वाचं नाव आहे. अवघ्या १६ वर्षांची असताना, काजोलने बेखुदी या सिनेमामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र तिचा पहिला सिनेमा तेवढी कमाल करू शकला नाही. पण तिचा दुसरा सिनेमा बाजीगर मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून पाहिलं नाही.
माघील जवळपास ३० वर्षांपासून काजोल बॉलीवूडवर राज्य करत आहे. तिचे लाखो नव्हे तर करोडो चाहते देश आणि देशाच्या बाहेर देखील आहेत. आई तनुजा आणि आज्जी शोभना कडून जणू तिने पोटातच अभिनयाचे धडे घेतले होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने एकापाठोपाठ एक सुपरहिट अनेक सिनेमा दिले.
लग्नानंतर तिने काही काळ सिनेमा पासून ब्रेक घेतला होता मात्र, फना सिनेमामधून तिने पुन्हा जबरदस्त एन्ट्री केली आणि तो सिनेमा देखील सुपरहिट ठरला. राणी मुखर्जीने देखील बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होत. आज राणी मुखर्जी हे एक मोठं नाव असलं तरीही, सुरुवातीच्या काळात काजोलची बहीण म्हणूनच तिला ओळखलं जात होत.
मात्र तिने देखील आपल्या उत्तम अश्या अभिनयाच्या जोरावर, अनेक हिट सिनेमा दिले आणि स्वतःची जागा निर्माण केली. तर दुसरीकडे काजोलची सख्खी बहीण तनिशाने देखील २००३ मध्ये डिनो मोरयासोबत ‘शश’ या सिनेमामधून पदार्पण केलं होत. मात्र तिचा पहिला चित्रपट पूर्ण फ्लॉप ठरला.
दिसायला काजोल आणि आई तनुजाची झलक असणाऱ्या तनिशाला मात्र बॉलीवूड मध्ये करियर बनवता आलं नाही. पहिल्या सिनेमा नंतर तनिशाने निल अँड निक्की सिनेमामध्ये एका अत्यंत बो’ल्ड अश्या मुलीची भूमिका साकारली होती. न्यू-एज सिनेमा म्हणून या सिनेमाचा चांगलाच गाजावाजा करण्यात आला होता. त्या सिनेमामधून एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तनिशाने आपली ओळख निर्माण केली होती.
मात्र, तो ही काळ खूप जास्त वेळ तिच्या करियरमध्ये राहिला नाही नाही तिला प्रेक्षकांनी नापसंत केलं. याबद्दल दुःख व्यक्त करत तनिशा म्हणते, काजोलची बहीण या ओळखीमुळंच माझं करियर संपलं. ‘एका हिट अभिनेत्रीची फ्लॉप बहीण’ म्हणून माझी ओळख निर्माण झाली होती. पुढे तनिशा बोलते, “मी सिनेसृष्टीत करिअर करण्याचा खूप प्रयत्न केला.
मी माझ्या अभिनय कौशल्यावर काम केलं. योग्य पटकथा निवडल्या. नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबतच काम केलं. पण तरीही यश मिळालं नाही. काही गोष्टी तुमच्या नशिबावर देखील अवलंबून असतात. माझी तुलना कायमच काजोलसोबत केली गेली.
ती नक्कीच एक उत्तम अभिनेत्री आहे. पण तिने हळूहळू जम बसवला. करिअरच्या सुरुवातीस तिने देखील काही चुका नक्कीच केल्या आहेत. पण त्याच चुकांसाठी माझी खिल्ली उडवली गेली. कदाचित मी काजोलची बहिण नसती तर आज बॉलिवूड सुपरस्टार असती असं कधीकधी वाटतं.”