डिट्टो आईची कबर्न कॉफी दिसते ‘करिश्मा’ची मुलगी, पहा कमी वयातच दिसते अतिशय हॉट…

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर ही 90च्या दशकाची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्माने तिच्या सौंदर्याने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिश्माने 1991 साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती.
पहिल्या चित्रपटातून धमाका केल्यानंतर, करिश्माने पुन्हा एकामागून एक अनेक चित्रपटांत काम केले. करिश्मा तिच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तथापि, मुले आणि कुटुंबीयांमध्ये व्यस्त झाल्यानंतर करिश्माने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले होते.
यापूर्वी करिश्मा कपूर अभिषेक बच्चनसोबत लग्न करणार होती. परंतु काही कारणांमुळे हे नातं तुटले. त्यानंतर 2003 मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले. सुरुवातीला सर्व ठीक होते. अदारा आणि कियान ही दोन मुलेही जन्माला आली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघांनीही 2014 मध्ये घटस्फो’टासाठी अर्ज केला होता. 2016 मध्ये दोघांचे घटस्फो’ट झाले.
आणि आता करिष्मा एकटीच मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्माला मुलगी समायरा आणि मुलगा कियान असे दोन मुलं आहेत. पण सध्या करिष्मा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिची मुलगी समायरा आहे. करिश्माप्रमाणेच तिची मुलगी समायराही खूप सुंदर आहे.
समायरा दिसायला अतिशय स्लिम आणि सुदंर असून अनेक प्रसंगी ती स्पॉट होत असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात. स्लिम समायरा अनेक प्रसंगी ग्लॅमरस दिसली आहे. मग ते वेस्टर्न ड्रेस असो किंवा देसी लेहेंगा समायरा खूप स्टायलिश दिसते. अनेकदा समायरा कपूर कुटुंबासोबतचे फोटो समोर येत असतात.
नुकताच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. करिश्माची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांना पार्टी किंवा विमानतळावर स्पॉट केलं जातं. समायरा, करिश्मा कपूर आणि संजय कपूरची मुलगी आहे. करिश्मा एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. आताही तिची चर्चा रंगत असते.
समायराचे तिच्या वडिलांच्या नव्या कुटुंबासोबत देखील चांगले संबंध आहेत. समायराला अनेकवेळा संजय कपूर आणि प्रिया सचदेवसोबत वेळ घालवताना पाहिलं गेलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये समायरा एअरपोर्टवर दिसत आहे. यादरम्यान समायरा ब्लॅक स्पॅगेटी टॉप आणि ग्रे ट्रॅक पॅंटमध्ये दिसली. डोळ्यांवर चष्मा आणि लांब मोकळे केस, साध्या लूकमध्येही ती खूप सुंदर दिसत आहे.
कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमात सामायरा हजेरी लावत असते तसेच ती तिच्या वडिलांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमातही आवर्जून हजेरी लावत असते. मात्र इतर स्टारकिड प्रमाणे तिला लेट नाईट पार्टी वगैरे आवडत नाही. तीला लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही, ती स्वत:ला या झगमगत्या जगापासून दूर ठेवते.