डिंपल कपाडियाला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणायचे लोकं, अखेर नर्गिसनेच केला होता ध’क्कादा’यक खुलासा…

डिंपल कपाडियाला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणायचे लोकं, अखेर नर्गिसनेच केला होता ध’क्कादा’यक खुलासा…

बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट रोमँटिक जोड्या आपण पहिल्या आहेत. काजोल- शाहरुख, राज कपूर-नर्गिस, वैजंतीमाला- दिलीप कुमार, माधुरी दीक्षित- अनिल कपूर, जुही चावला- आमिर खान, रणवीर सिंह – दीपिका अशा अनेक जोड्या आपल्या केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहेत.

बेस्ट रोमँटिक जोडी म्हणून अनेक वर्ष राज कपूर आणि नर्गिसची जोडी प्रसिद्ध होती. श्री ४२०, बरसात, आवरा, चोरी चोरी, आह, अनहोनी सारख्या सुपरहीट चित्रपटामध्ये ही जोडी बघायला मिळाली होती. या दोघांनी इतक्या जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले की, त्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगली चर्चा रंगली होती.

राज कपूर आणि नर्गिसच्या प्रेमाचे अनेक किस्से आज देखील बॉलीवूड मध्ये ऐकवले जातात. त्या दोघांमध्ये कोणते नाते होते याचा अद्याप उलगडा झाला नसला तरीही दोघांच्याही मनात एकमेकांविषयी सॉफ्ट कॉर्नर होता हे नक्की. खुद्द राज कपूर अनेकवेळा आपल्या मुलाखतींमध्ये नर्गिसचा आवर्जून उल्लेख करायचे.

सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या लग्नानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा कमी झाल्या. काळाच्या ओघात या चर्चा बंद होतील असं वाटत असतानाच 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ सिनेमा नंतर अचानकच त्यांच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. आजही बॉलीवूडमधील सर्वात रोमँटिक आणि उत्कृष्ट सिनेमा म्हणून बॉबी सिनेमाचा आवर्जून उल्लेख होतो.

या चित्रपटानंतर नर्गीस व राज कपूर यांच्या बद्दल एक वेगळीच अफवा इंडस्ट्रीज पसरली. आपल्या मुलाला म्हणजेच ‘ऋषी कपूर’ला राज कपूर यांनी बॉबी या चित्रपटातून लॉन्च केले. त्यावेळी अभिनेत्री म्हणून त्यांना नवीन चेहरा हवा होता. आणि चित्रपटाची अभिनेत्री म्हणून डिंपल यांची वर्णी लागली.

बॉबी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले आणि ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया रातोरात स्टार झाले. त्यावेळी जवळपास सर्वच जण डिंपलचे चहाते झाले. डिंपल प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर असताना अचानकच तिच्याबद्दल विचित्र अफवा पसरली.

डिंपल अजून कोणी नसून राज कपूर आणि नर्गिस या दोघांची मुलगी आहे, अशी अफवा बॉलीवूड मध्ये पसरली. बघता बघता अनेक मॅक्झिनच्या आणि वर्तमानपत्रांच्या गॉसिप कॉर्नर वरती ही अफवा हेडलाईन म्हणून झळकू लागली. सुरुवातीला राज कपूर आणि नर्गिस दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले. परंतु तोपर्यंत ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली होती.

याचा परिणाम संजय दत्तला भोगावा लागला. बोर्डिंगमध्ये शिकणारी मुलं संजय दत्तला डिंपल नामावरून चिडवायचे व त्यामुळेच संजय आपल्या आईवर नाराज राहू लागला. या अफवाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर असा परिणाम होत असल्याचा बघून अखेर नर्गिस यांनी त्याबद्दल मौन सोडलं आणि एका मुलाखतीमध्ये त्याबद्दल भाष्य केलं.

नर्गिस त्यावेळी म्हणाल्या, ‘अशा अफवा कुठून आणि कशा येतात हेच मला समजत नाही. ही अफवा कशी उठली हे देखील मला ठाऊक नाही. नक्कीच डिंपल खूप सुंदर मुलगी आहे. अभिनयाच्या बाबतीत देखील ती उत्तम आहे. ‘आवारा’तील माझ्या लूकशी मिळता जुळता ‘डिंपल’ चा लूक आहे कदाचित यामुळेच अशा प्रकारच्या कथा रचण्यात आल्या असाव्या.

मात्र अशी अफवा पसरवणे अगदी मूर्खपणा आहे. देव न करो पण असं काही घडलं असतंच तर मी जगाची पर्वा न करता माझ्या मुलीला नक्कीच स्वीकारलं असतं. डिंपल खूपच समजूतदार मुलगी आहे. व तीने देखील या अफवाना गमतीवर घेतले असून त्याकडे दुर्लक्ष केलं.

या अफवा सुरू असताना सुनीलने माझी साथ दिली आणि मुलांना देखील याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. अशा गोष्टीचा ताण घेऊन मला मरायचं नाही.’ दरम्यान, डिंपल या एका मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे. राज कपूरने तिला त्यांच्या सिनेमातून लॉन्च करावं यासाठी तिच्या वडिलांनी त्यांच्याकडे विनंती केली होती. चौदाव्या वर्षी बॉबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या डिंपल आज वयाच्या 65 व्या वर्षी देखील काम करत आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.