टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑलराउंडर रविंद्र जडेजाची जागा धोक्यात! हा ऑलराउंडर घेणार त्याची जागा ? रोहित-द्रविडनेही दिली पसंती…

भारतीय क्रिकेट संघाची धुरा सध्या रोहित शर्माच्या हातात आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने सुरेख कामगिरी करत वेस्ट इंडिजला ७ विकेट आणि ६ बॉल शिल्लक ठेवून हरवले.

या संघात अनेक नवीन खेळाडू खेळताना आपल्याला दिसत आहे. सूर्यकुमार यादव देखील अतिशय चमक कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे. आयपीलमध्ये जशी कामगिरी आतापर्यंत सूर्यकुमार यादवने केली आहे त्यालाच साजेशी कामगिरी तो आता करताना दिसत आहे.

त्याचबरोबर अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकला देखील सूर गावसल्यामुळे तो देखील भारतीय संघात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण आज आपण अलराउंडर रवीन्द्र जडेजा बद्दल बोलणार आहोत. भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा हा टी-ट्वेंटी आणि वनडे सामन्यांतील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो.

जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघात अगदी परफेक्ट बसतो. मात्र, असे असतानाही कर्णधार रोहित शर्माने त्याला तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. जडेजाच्या एवजी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली. या खेळाडूच्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

यामुळे आता हा खेळाडू टी-20 विश्वचषकातही रवींद्र जडेजाची जागा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खेळाडूचे नाव आहे दीपक हुडा. दीपक हा रवींद्र जडेजाप्रमाणेच गोलंदाजी आणि फलंदाजीही करू शकतो. दीपक हा काही चेंडूंतच सामन्याची दिशा बदलण्यातही तरबेज आहे. महत्वाचे म्हणाजे, तो कुठल्याही गोलंदाजाला फोडून काढू शकतो. तो सुरुवातीला टीकून खेळतो. मात्र, एकदा खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर तो मोठी खेळीही खेळू शकतो.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, दीपक कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. दीपक हुडा हा टी-20 वर्ल्ड कपसाठीचा मोठा दावेदार असल्याचे मानले जात आहे. तो कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्याही पसंतीचा आहे. हुडाने आयपीएल 2022 मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. लखनै सुपर जायंट्सकडून त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12