टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू आहे गलेलठ्ठ श्रीमंत, सासरा DGP, बायको वकील तर वडील आहे CEO…

प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये आयपीएलचे सामने खेळले जातात. या सामन्यांवर जितकी जास्त टी’का होते, त्याहून अधिक जास्त फॉलोवर्स आहेत. आयपीएलच्या सामन्यांमुळे, आपल्या देशातील अनेक गल्लीबोळातील क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते.
त्यामुळे देखील या सामन्यांचे खास महत्व आहे. आयपीएल ने आपल्या टीम इंडियाला अनेक उत्तम खेळाडू दिले असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेक खेळाडूंची प्रतिभा सर्वप्रथम आयपीएलच्या सामन्यांत बघायला मिळाली आणि त्यानंतरच त्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. अशा काही खेळाडूंपैकी एक मयांक अग्रवाल देखील आहे.
सध्या मयांक अग्रवाल चांगलाच चर्चे’चा विषय बनला आहे. माघील कित्येक सीझनमध्ये त्याने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत मोठा चाहतावर्ग कमवला आहे. मयांक अग्रवाल पंजाबच्या संघाकडून खेळतो. मात्र टीम इंडियामध्ये देखील आता त्याने आपला चांगलाच जम बसवला आहे. तसे तर आपल्या देशात क्रिकेट सगळ्यात आवडता खेळ आहे, त्यामुळे त्याची लोकप्रियता असणे सहाजिकच आहे.
मात्र संघातील खेळाडूंची देखील प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक क्रिकेटपटूंनी फॉलोवर्सच्या बाबतीत, बॉलीवूड सेलिब्रटीजला देखील माघे टाकले आहे. मयांक अग्रवालचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहतवर्ग आहे. अगदी सर्व साधारण दिसणाऱ्या मयांकने आपल्या ओपनिंग बॅटिंग कौशल्याने अनेकांचे मन जिंकली आहेत.
मात्र, मयांक साधारण दिसत असला, तरीही तो गर्भश्रीमंत आहे. त्याचे वडील अनुराग अग्रवाल हे एका मोठ्या फार्मा कंपनीचे सीइओ आहेत. तर मयंकचे सासरे डीजीपी आहेत. होय अनेक मुलींमध्ये सध्या पॉप्युलर होत असलेला मयांक विवाहित आहे. त्याची पत्नी आशिता सूद देखील एक मोठी वकील आहे. आशीता आणि मयांक दोघेही बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत.
खूप आधीपासून ते एकमेकांना आवडतात. आणि संधी मिळताच मयांकने देखील आपल्या बालमैत्रीण सोबत लग्न उरकून घेतले. त्याचे सासरे प्रवीण सूद डीजीपी आहेत. एकूणच मयांक अग्रवाल गडजंग संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे सध्या ३.५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच तब्ब्ल २७ ते २९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या बाईक्स देखील आहेत.
२-३ महागड्या गाड्या देखील मयांककडे आहेत. त्याचबरोबर, बंगलोर सारख्या शहरात त्याचे काही फ्लॅट्स आणि जमिनी देखील आहेत. आयपीएल मधून स्टार बनलेला मयांक अग्रवाल आज टीम इंडियाचा एक उत्तम आणि महत्वाचा खेळाडू आहे. यंदाच्या आयपीलमध्ये पंजाबचा संघ मयांकच्या नेतृत्वाखाली सामने खेळणार आहेत. त्यामुळे कॅप्टन म्हणून त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.