‘झुंड’ विरुद्ध ‘कश्मीर फाइल्स’ सिनेमा, ‘या’ वा’दावर नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया.., म्हणाले; झुंड बघणारे प्रेक्षक…

‘झुंड’ विरुद्ध ‘कश्मीर फाइल्स’ सिनेमा, ‘या’ वा’दावर नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया.., म्हणाले; झुंड बघणारे प्रेक्षक…

बॉलिवूडचे शहनाशह अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट अतिशय चर्चेत होता.

नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यामुळे आणि यामध्ये महानायक बिग बी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सैराटची संपूर्ण टीम एकत्र आली. म्हणजे पुन्हा एकदा प्रेक्षकांना आर्ची आणि पारश्याला एकत्र बघितलं.

पण त्याहूनही जास्त चर्चा होताना दिसत आहे ती पावनखिंड आणि काश्मीर फाइल्स या दोन चित्रपटांची. शिवजयंचीच्या आधी १८ फेब्रुवारीला पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला तरी देखील या चित्रपटाची विक्रमी घोडदौड सुरूच आहे. हा चित्रपट मराठीमधील सुपरडुपर हिट चित्रपट ठरला आहे.

त्याचदरम्यान, काश्मीर फाइल्स या चित्रपटाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. कोणत्याही न्यूज चॅनेल टेलिव्हिजन वरील शोने या चित्रपटाची दखल घेतली नाही. त्याचबरोबर या चित्रपटाला कमी स्क्रीन मिळाला तरी देखील हा चित्रपट अतिशय सुसाट अशा वेगाने चालत आहे. कुठलेही प्रमोशन नसताना फक्त सोशल मीडियामुळे हा चित्रपट हिट झाला आहे.

मात्र, सोशल मीडियावर एक वेगळे सत्र बघायला मिळत आहे. या तिन्ही चित्रपटावरून सोशल मीडियाचे वातावरण तापले आहे. अनेक प्रेक्षक आपल्या आवडत्या चित्रपटाला सपोर्ट करत असताना दुसऱ्या चित्रपटांवर टीका करताना दिसत आहे. आता सगळ्यात झुंड चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

झुंड’, ‘पावनखिंड’ आणि ‘काश्मीर फाईल्स’ या सिनेमावरून जो वा’द सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. मी फक्त झुंडच बघणार असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचंही मला पटत नाही. तुम्ही सगळे सिनेमे पाहा. अगदी पावनखिंड आणि काश्मीर फाईल्सही पाहा.

कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वा’द आहे. त्याला काही अर्थ नाही, असं देखील नागराज मंजुळे म्हणाले. झुंड सिनेमा टॅक्स फ्री व्हावा याकरता मिटिंग घेतली जात असल्याची कोणतीच कल्पना नागराज मंजुळे यांना माहित नसल्याचं सांगितलं जात आहे. माझ्या प्रेमापोटी देखील झुंड पाहा असं म्हणणाऱ्या लोकांच देखील मला पटत नाही. माझी विनंती आहे, असं काही करू नका. रागाने किंवा माझ्या प्रेमापोटी झुंड पाहा असं अजिबातच म्हणू नका.

सिनेमा आहे, पाहा, विचार करा, तुमच्या जीवनात त्याचा परिणाम झाला तर चांगलच आहे. सिनेमा चालू राहणारच, दिग्दर्शक घरी राहणार पण तुम्ही सिनेमाबाहेर अशी हा’णामा’री करणं योग्य नाही, असं मत नागराज मंजुळेने व्यक्त केलंय.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.