‘झुंड’नंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी उत्सुक; नागराजने दिले स्पष्टीकरण म्हणाला; रितेश देशमुख आणि मी…

‘झुंड’नंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी उत्सुक; नागराजने दिले स्पष्टीकरण म्हणाला; रितेश देशमुख आणि मी…

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वा’द विवा’द होताना दिसताहेत. प्रस्थापित लोकांवि’रोधात नागराज मंजुळे हा चित्रपट बनवतो, असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी एक कलाकृती म्हणून या चित्रपटाकडे पहावे, असे देखील अनेक जण म्हणत आहेत.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेमच कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटाची च’र्चा देखील खूप होत आहे. नागपूरचे विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना प्रशिक्षक देऊन त्यांना आपल्या आयुष्यात प्रगतीची वाट दाखवतो, अशी या चित्रपटाची साधी-सोपी कथा आहे.

नागराज मंजुळे हे वंचित घटकांवर आधारित चित्रपट बनत असल्याचे त्यांच्यावर आरोप नेहमी होतात. मात्र, समाजातील वास्तव चित्रण आपण दाखवत असतो, असे नागराजाने स्पष्टीकरण देताना सांगितले होते. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले.

त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री हा चित्रपट दिग्दर्शित केला. फॅन्ड्री चित्रपटालाही चांगले यश मिळाले होते. मात्र, खऱ्या अर्थाने नागराज मंजुळे यांना बॉलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली ती सैराट या चित्रपटाने. सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला. मराठी मध्ये या चित्रपटाने विक्रमी शंभर कोटींचा व्यवसाय केला होता. आज एवढे पैसे कमावणारा हा मराठीतील एकमेव चित्रपट आहे.

आता नागराज मंजुळे हे पुन्हा एकदा च’र्चेत आले आहेत. कारण नागराज मंजुळे हे शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे दोन वर्षांपूर्वी सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक ट्रिजर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र को’रोना म’हामा’रीचा उद्रे’क राज्यासह देशांमध्ये झाला आणि या चित्रपटाचे चित्रीकरण हे लांबणीवर पडले.

चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, असे सांगण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट रितेश देशमुख हा निर्मित करणार असल्याचेही सांगण्यात येते. 2019 मध्ये हा चित्रपट येईल असे सांगण्यात येत होते. त्याप्रमाणे त्याचा ट्रिजर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या टीझरमध्ये हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले होते.

नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाबाबत बोलताना नुकतेच सांगितले की, महामारीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण विस्कळित झाले आहे. आम्हाला दोन वर्ष गमवावी लागलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक रित्या चित्रपटाचे काम करता आलं नाही. त्यामुळे हा चित्रपट रखडला असे आपण बोलू शकत नाही. मात्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच हा एक उत्कृष्ट प्रकल्प आहे. या चित्रपटाबद्दल मी ही तुमच्या एवढाच उत्सुक आहे. याबाबत सर्व काही व्यवस्थित झाले की, तुम्हाला याची माहिती देणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजंवरील चित्रपटाची निर्मिती करणे, हे आव्हानात्मक असेल.

मात्र, असा चित्रपट करणे हे आपले भाग्य आहे, असेही नागराज मंजुळे यांनी सांगितले आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख हा मुख्य भूमिकेत आहे, तर अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट असेल, असेही नागराज मंजुळे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

“मी जेव्हा लहान होतो तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती छान होईल, याचा विचार करायचो. मी त्यांच्यावर निर्मित झालेले दोन चित्रपट पाहिले आणि आता मला ते स्वत: बनवायचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे”, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘शिवत्रयी’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. ‘शिवत्रयी’ नावावरून हा एकच चित्रपट नसून तीन चित्रपटांची सीरिज असणार आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.