झांसीची राणी मधील ही चिमुकली बालकलाकार 10 वर्षानंतर दिसतेय इतकी सुं’दर आणि ग्लॅ’मरस, पहा फोटोज…

मित्रांनो, आज आपण बोलनार आहोत बालकलाकार अशनुर कौर बद्दल, जी झाशी की राणी या टीव्ही मालिकेने घरा घरात पोहचली होती. तिचा जन्म 2004 मध्ये दिल्ली येथे झाला. अशनूर कौरने लहान वयातच छोट्या पडद्यावर बर्याच कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
सोनी वाहिनीवर सन २०१२ मध्ये सीआयडी मालिकेतही तिने काम केले आहे. वयाच्या 14 व्या वर्षी अश्नूर कौर खूप लोकप्रिय झाली आहे आणि तिची सुंदर छायाचित्रेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. २००९ मध्ये झांसी की रानी या टीव्ही कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अशनुर कौर आता मोठी झाली आहे.
झाशीची राणी, ना बोले तुम ना में कुछ बोलू, माता दुर्गा सारख्या मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणारी अशनुर कौर ही आज इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. ती आता मोठी झाली आहे आणि तिने मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत तिने आता चित्रपटात सुद्धा काम करणे सुरु केले आहे.
बाल कलाकार म्हणून, चित्रपट उद्योगात प्रवेश करणारी अशनुर तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते. झांसीच्या राणीसारख्या मालिकांमध्ये प्राची नावाच्या मुलीची भूमिका करणार्या अशनुरचे सध्याचे फोटोज बघून तिला ओळखणे फार कठीण आहे.
तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील पटीयाला बेब्स या मालिकेत मिनीच्या भूमिकेत दिसत आहे.
हिंदीतल्या मालिका व चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर पटियाला बेब्स फेम अभिनेत्री अशनूर कौर आता मराठीत देखील दिसत आहे. सोशल माध्यमावर ट्रें’डिं’ग असलेला अशनूर कौर हा युवा चेहरा आणि शोभना गुदगे या दोघींचा मस्तीभरा अंदाज ‘स्वाग सलामत’ या अल्बम मध्ये पहायला मिळत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वाग सलामत या मराठी गाण्याने दोनच दिवसांत ८ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. तरुणाईला या गाण्याचा अनोखा अंदाज चांगलाच आवडला आहे. तिच्या मराठी चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
एका मुलाखतीत तिने पटीयाला बेब्स मालिका करण्याचे कारण सांगिलते होते. ती म्हणाली की, कोणत्याही मुलीसाठी तिची आई ही तिची सगळ्यात चांगली मैत्रीण असते. मिनी तिच्या आईबरोबर जसं वागते आणि तिची काळजी घेते ते माझ्या मनाला भावले.
मिनी आणि बेब्समधील ह्या बंधनामुळेच मी ही मालिका स्वीकारली. आणि खरं कारण म्हणजे माझं माझ्या आईबरोबरसुद्धा असंच नातं आहे. ती माझ्याबरोबर प्रत्येक सेटवर असते. माझ्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी तिने खूप गोष्टींचा त्याग केला आहे.
मी जे काही करू शकते ते फक्त तिच्यामुळेच आहे. मिनीची भूमिका ही तिने माझ्यासाठी केलेल्या त्यागांसाठी आहे. आईला धन्यवाद देण्याची माझ्यासाठी ही एक संधी आहे. असे बोलत अशनूरने तिचे आणि आईचे नाते किती जवळचे आहे हे सांगितले आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.