ज्या अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका केली त्याच अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नाना पाटेकर…पहा तिच्यामुळेच पत्नीपासून झाले विभक्त..

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की जे मराठी पार्श्वभूमीचे आहेत. मराठी असून देखील त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा मोठा दबदबा निर्माण केलेला आहे. यामध्ये जुन्या काळातील अभिनेते अमोल पालेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ज्यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांचा बॉलीवूडमध्ये मोठा दबदबा होता.
त्यावेळेस अमोल पालेकर यांनी त्यांना टक्कर न देता हलकीफुलकी चित्रपट केले. त्यांचे चित्रपट प्रचंड चालले. मात्र, अमिताभसोबत त्यांची स्पर्धा कधीच नाही केली. याउलट त्यांनी खुमासदार चित्रपट करून सर्वांची वाहवा मिळाली. चितचोर, गोलमाल सारखे चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात.
यामध्ये नाना पाटेकर यांचा देखील समावेश करावं लागेल. नाना पाटेकर यांच्यावर आजवर अनेक लेख छापून आलेले आहेत. नाना पाटेकरचे चित्रपट म्हणजे अतिशय दर्जेदार असे असतात. नाना पाटेकर वर्षातून एखादा चित्रपट करतात. मात्र, त्यामध्ये दर्जा हा असतो. नाना पाटेकर यांनी आजवर चरित्र, गंभीर, कॉमेडी, खलनायक भूमिका असलेले अनेक चित्रपट केले आहेत.
मात्र, चित्रपटांसोबतच नाना पाटेकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यात जन्मलेले विश्वनाथ पाटेकर हे आज नाना पाटेकर या नावाने ओळखले जातात. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या यादीत नाना पाटेकर यांचे नाव समाविष्ट आहे.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले असून यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांचे एकदा इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मनीषा कोईरालासोबत अफेअर होते. मनीषा कोईराला यांना नेपाळी ब्युटी म्हणूनही ओळखले जाते. ‘खामोशी : द म्युझिकल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे.
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी बाप-मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर नाना आणि मनिषा यांचा अग्निसाक्षी हा आणखी एक चित्रपट आला, असे म्हटले जाते की हा चित्रपट रिलीज होईपर्यंत त्यांचे अफेअर क्लाउड नाइनवर होते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला याची कल्पना आली.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, नाना अनेकदा अभिनेत्रीच्या घरी ये-जा करताना दिसत होते. मात्र, त्यांचे नाते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर त्यांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडला आणि त्यानंतर आता नीलकांती आणि नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहतात. दोघेही परस्पर संमतीने वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येते. आता याचे खरे कारण या दोघांनाच माहिती असावे.