जेव्हा ‘साया’ चित्रपटातून, जॉनने कॅटरिनाला काढलं होत बाहेर; पहा तेव्हा सलमान खानने..

जेव्हा ‘साया’ चित्रपटातून, जॉनने कॅटरिनाला काढलं होत बाहेर; पहा तेव्हा सलमान खानने..

बॉलीवूड मध्ये काम करत असताना, सुंदर दिसणे हा अघोषित नियमच आहे. त्यामुळेच तर बॉलीवूड हे जगातील सर्वात सुंदर असं कलाविश्व समजलं जात. अनेकवेळा अभिनेत्रींच्या कौशल्यापेक्षा त्यांचा दिसण्याला महत्व दिल जातं. कारण सुंदर आणि हॉट अभिनेत्री असेल तर साहजिकच तिला बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील असा विचार मेकर्स करतात.

मात्र अश्या वेळी, अभिनेत्रीला येत नसलेल्या अभिनयामुळे, उत्तम स्क्रिप्ट व दिग्दर्शक असूनही तो सिनेमा फ्लॉप होतो. काही अभिनेता, सिनेमा करताना याकडे देखील खास लक्ष देतात कि सहकलाकार म्हणजेच या सिनेमाची अभिनेत्री कोण आहे? असंच काही, बॉलीवूड मधील सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जाणारा, जॉन देखील करतो.

बॉलीवूडकरांच्या सक्सेस मंत्राच्या बराच वेगळा, जॉनचा फंडा असतो. सुरुवातीपासून जॉन वेगळ्या भूमिका साकारत आला आहे. सोबत काम करणारी सहकलाकार म्हणजेच अभिनेत्री दिसायला कमी सुंदर असेल तरीही चालते मात्र, तिला अभिनय यायला हवा असं ठाम मत जॉनच असतं. आपल्या सिनेमाच्या बाबतीत तो काहीच तडजोड करत नाही.

असंच काही झालं होत, भट कॅम्पच्या एका थरार सिनेमाबद्दल. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या साया या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक काम केलं. मात्र क्रिटिक्स कडून’ या सिनेमाला चांगलीच दाद मिळाली होती. उत्तम कथानकाला तेवढ्याच चांगल्या अभिनयाची जोड म्हणून या सिनेमाने चांगलेक कौतुक मिळवले होते.

मात्र, या सिनेमामध्ये सुरुवातीला तारा शर्माच्या जागी कॅटरिना कैफची निवड करण्यात आली होती. जॉन आणि कॅटरिनाचे या सिनेमासाठी फोटोशूट देखील झालं होत. मात्र सिनेमाचं चित्रीकरण सुरु झालं आणि काही सीनमध्येच जॉनच्या लक्षात आलं की, कॅटरिनाला पाहिजे तसा अभिनय येत नाही. मग काय, जॉनने मेकर्स समोर अटच ठेवली, एक तर कॅटरिनाला या सिनेमात ठेवा नाही तर मला.

तेव्हा कॅटरिना एक स्ट्रगलिंग अभिनेत्री होती. बॉलीवूडमध्ये तिचं नावं नव्हतं,शिवाय खरोखरच सिनेमाला हवा तास अभिनय तिला येत नव्हता. त्यामुळे मेकर्सने तिला जॉनच्या सांगण्यावरून या सिनेमामधून बाहेर काढलं आणि तिच्या जागी तारा शर्माची निवड केली. त्यानंतर, ती थेट सलमानकडे गेली आणि ओक्सबोक्षी रडू लागली.

सतत तीन दिवस ती रडत होती असं, खुद्द सलमानने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होतं. पण मेकर्सने तिला सिनेमातून काढताना दिलेलं कारण चुकीचं नव्हतं. म्हणून त्याने कॅटरिनाची समजूत काढत आपला अभिनय सुधारवण्याचा सल्ला दिला. पार्टनर, नमस्ते लंडन, वेलकम अश्या सिनेमामुळं कॅटरिनाला यश मिळत गेलं आणि आपला अभिनय देखील तिने सुधरावला.

२००९ मध्ये न्यूयॉर्क सिनेमासाठी कबीर खान यांनी कॅटरिना आणि जॉन ची मुख्य पात्र म्हणून निवड केली. तेव्हा पुन्हा कॅटरिना सलमान खान कडे गेली आणि आता मला जॉनसोबत सिनेमा नाही करायचा म्हणून अट ठेवायचं म्हणू लागली. साया सिनेमामधून बाहेर काढून जॉनने आपला अपमान केला आहे असं तीच म्हणणं होत.

पण, तेव्हा देखील सलमानने तिची समजूत काढली आणि सांगितले केवळ आपल्याकडे आता ती पॉवर आली आहे म्हणून त्यांनी जे केलं तेच आपण करावं असा काही नियम नाही. कबीर खानने विचार करुनच या सिनेमामध्ये तुम्हाला दोघांना घेण्याचा निर्णय घेतला असेल. कॅटरिनाने देखील सलमानच ऐकलं आणि जॉनसोबत न्यूयॉर्क सिनेमा केला.

तो सिनेमा त्यावर्षीच्या, सर्वात उत्तम सिनेमांपैकी एक ठरला. नेहमीच सलमान खानच्या रागीट स्वभावाची चर्चा होती, मात्र त्याच्यामध्ये समजूतदारपण देखील आहे. म्हणूनच न्यूयॉर्क सारखा उत्तम सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12