जेव्हा ‘सलमान’ खानला बोलले होते ‘राजकुमार’ ; बेटा, अपणे अब्बा से पूछकर आओ की हम कौन है ? त्यानंतर सलमान खानने…पुढे घडले असे…

जेव्हा ‘सलमान’ खानला बोलले होते ‘राजकुमार’ ; बेटा, अपणे अब्बा से पूछकर आओ की हम कौन है ? त्यानंतर सलमान खानने…पुढे घडले असे…

हिंंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार झाले पण केवळ दमदार संवादफेकीच्या शैलीवर प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे डॉयलॉगचे बेताज बादशहा म्हणजे अभिनेते राजकुमार. महबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्‍याच्या भूमिकेत दिसले.

पूर्ण चित्रपट नरगिस यांना केंद्रित ठेवून केलेला होता. पण आपल्या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. या चित्रपटाच्या यशानंतर एक अभिनेता म्हणून राजकुमार यांची यशस्वी कारकिर्द सुरु झाली.

1959 मध्ये प्रदर्शित पैगाम या चित्रपटात त्यांच्यासमोर अभिनय सम्राट दिलीपकुमार होते. पण राजकुमार यांनी आपल्या सशक्‍त अभिनयाच्या जोरावर दर्शकांची वाहवा मिळविली. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले.

मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला. खरं तर त्याकाळातील राजकुमार अभिनयासाठी आणि त्यांच्या शैलीसाठी परिचित होते. पण राजकुमार यांची बोथट उत्तरे देण्याची वृत्ती प्रसिद्ध होती. ती म्हणजे राजकुमार कुणालाही काहीही बोलायला मागेपुढे पाहात नव्हते.

अशा परिस्थितीत आज आपण राजकुमार यांची ती कहाणी जाणून घेऊ. सलमान खानचा त्यांना राग आला होता. वास्तविक वेळ तेव्हाची आहे जेव्हा सलमान खानचा चित्रपट ‘मैंने प्यार किया’ सुपरहिट ठरला. २९ डिसेंबर १९८९ रोजी रिलीज झालेल्या ‘मैंने प्यार किया’ची सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती.

राजकुमार यांना चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनीही स’क्से’स पार्टीमध्ये आमंत्रित केले होते. पार्टीत आलेले राजकुमार यांनी स्वत: सूरज बडजात्या यांना म्हटले की, मला चित्रपटाच्या स्टारकास्टला भेटायचे आहे. राजकुमार यांचे म्हणणे ऐकून सूरज बडजात्या सलमान खानला त्यांच्याशी ओळख करून देण्यासाठी घेऊन गेले.

सलमान खान राजकुमार यांना कधी भेटला नसल्यामुळे अचानक जेव्हा राजकुमार यांच्याशी भेट झाली तेव्हा त्याने विचारले की, आपण कोण ? सलमानच्या तोंडून हे ऐकून राजकुमार यांचा पारा चढला. संतप्त होऊन राजकुमार यांनी सलमान खानला उत्तर दिले आणि म्हणाले, ‘बेटा, अपने अब्बा से पूछकर आओ कि हम कौन हैं?

सब इन्स्पेक्टरपासून अभिनेता बनलेले राजकुमार यांची सुरुवातीची कारकीर्द चांगली नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही, ज्यामुळे त्यांनी ‘दिल अपना और प्रीत पराई -१९६०, घराना- १९६१, गोदान- १९६३, ‘दिल एक मंदिर- १९६४, दूज का चांद- १९६४’, ‘काजल- १९६५ हमराज़- १९६७, नीलकमल- १९६८’ मेरे हुजूर- १९६८.

तसेच हीर रांझा- १९७०, पाकीज़ा- १९७१,कुदरत- १९८१, धर्मकांटा- १९८२, शरारा- १९८४, राजतिलक- १९८४, एक नयी पहेली- १९८४, मरते दम तक- १९८७, सूर्या- १९८९, जंगबाज- १९८९, पुलिस पब्लिक- १९९०’ आणि ‘सौदागर- १९९१’ यासह अनेक हिट चित्रपट दिले. राजकुमार यांनी १९९६ मध्ये जगाला निरोप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12