जेव्हा अभिनेता जितेंद्र यांनी मिथुन चक्रवर्ती बद्धल केले होते खूपच खालच्या पातळीचे वक्तव्य, म्हणाले; की जर ‘हा’ काळा…

जेव्हा अभिनेता जितेंद्र यांनी मिथुन चक्रवर्ती बद्धल केले होते खूपच खालच्या पातळीचे वक्तव्य, म्हणाले; की जर ‘हा’ काळा…

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की, ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय स्ट्रगल करून आपले करिअर घडवलेले आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये स्टार कीड जे आहेत त्यांना चित्रपटात करियर करण्यासाठी अजिबात झगडावे लागले नाही. त्यांना चित्रपट हे सहज मिळाले.

याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांची ओळख बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात असणे हे होय.आता बॉलीवूड मध्ये असे काही कलाकार आहेत की, ज्यांना कुणीही गॉडफादर नव्हते. यामध्ये आपल्याला आवर्जून नाव घेता येईल ते शाहरुख खान याचे. शाहरुख खान याला बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नव्हता. आपल्या हिमतीच्या जोरावर त्याने आपले करियर केले.

त्याचप्रमाणे अक्षय कुमार देखील असाच आहे. त्याने देखील आपल्या हिमतीच्या जोरावर करियर केले आहे. याप्रमाणे एक असा अभिनेता आहे ज्याने देखील कुठलीही पार्श्वभूमी नसताना चित्रपट सृष्टीमध्ये करिअर केले. या अभिनेत्याचे नाव मिथुन चक्रवर्ती असे आहे. मिथुन चक्रवर्ती यांचे सध्या वय साठ वर्षाच्या वर असले तरी या वयातही ते चित्रपट करत असतात.

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म बांगलादेशच्या बारीशाल येथे झाला होता. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांचे कुटुंब कोलकता येथे राहायला आले. त्यानंतर काही काम नसल्यामुळे मिथुन चक्रवर्ती हे न’क्षली चळवळीमध्ये देखील सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. या दरम्यानच मिथुन चक्रवर्ती यांचा भावाचा मृ’त्यू झाला. त्यामुळे त्यांच्या जीवनावर याचा खूप मोठा परिणाम झाला.

त्यामुळे त्यांनी थेट पुणे गाठले आणि त्यानंतर पुण्यातील चित्रपट संस्थेमधून त्यांनी अभिनयाची पदवी मिळवली. ही पदवी घेतल्यानंतर मिथुन यांनी थेट मुंबईत करिअर करण्याचे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी मुंबई गाठली. मात्र, त्यांचा रंग काळा होता. त्यामुळे त्यांना चित्रपटात काम करण्यास कोणीही होकार देत नव्हते. अशा वेळेस त्यांनी खूप संघर्ष करून 1976 मध्ये मृगया हा चित्रपट मिळवला.

या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर त्यांना खर्‍या अर्थाने चित्रपटाची वाट सुकर झाली. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना डिस्को डान्सर हा चित्रपट मिळाला होता. या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मात्र त्या आधी एका दिग्गज अभिनेत्याने मिथुन चक्रवती यांच्या बाबतीत एक वा’दग्रस्त वक्तव्य केले होते.

हा अभिनेता म्हणजे जम्पिंग जॅक जितेंद्र हे होते. जितेंद्र त्यावेळेस म्हणाले होते की, या कालियाला कोणी चित्रपटात काम दिले तर मी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेईल. त्यानंतर असे काही झाले नाही. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडमध्ये करिअर केले आणि जितेंद्र देखील एकीकडे चित्रपट करत राहिले. त्यानंतर या दोघांनी देखील अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. कालांतराने या गोष्टीचा या दोघांनाही विसर पडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12