‘जेठालाल’ भूमिकेसाठी दिलीप जोशी नव्हे, तर ‘हे’ 5 कलाकार होते निर्मात्याची पहिली पसंती, पहा कपिल शर्मा…

भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील लॉंगेस्ट रनींग शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला नावाजण्यात आलं. या मालिकेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात आली आहे. लॉंगेस्ट रनींग शो असला तरीही, या मालिकेची फॅन फॉलोविंग अजून देखील कायम आहे.

प्रेक्षकांना खळखळून हसवत मोलाचा संदेश देणाऱ्या या मालिकेचे चाहते परदेशात देखील आहेत. या मालिकेने विनोदी मालिकेचे इतर सर्वच विक्रम मोडत एक नवीन विक्रम केला आहे. माघील जवळपास दोन दशकांपासून ‘तारक मेहता..’ मालिका जगभरातील लोकांना हसवण्याचे आणि काही क्षण तरी आपला सर्व ताण, दुःख विसरायला लावते आहे.

आपल्या हटके अश्या विनोदी शैली मध्ये या मालिकेने कायमच सर्वांचे मनोरंजन केले आहे. याचे श्रेय केवळ मेकर्सला किंवा कोणत्याही एका कलाकाराला देता येणार नाही. याचे श्रेय या मालिकेमधील सर्वच कलाकारांना द्यायला हवे. या मालिकेमधील सर्वच कलाकारांनी आपली भूमिका उत्तम प्रकारे रंगवली, आणि आज जगभरात या सर्वांचे चाहते आहेत.

यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा होते. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मालिकेत आता दया म्हणजे दिशा वाकानीने मालिका सोडली असली तरी आजही जेठालालला पाहून दयाची आठवण रसिक काढतात.

जेठालाल ही भूमिका साकरणारे दिलीप जोशी यांचीही मालिकेमुळे प्रचंड चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. त्यांचे चाहते अगदी जेठालाल प्रमाणेच ख-या आयुष्यात ड्रेसिंग करताना दिसतात. कानाकोप-यात आज दिलीप जोशी जेठालाल म्हणून प्रसिद्ध आहेत. दिलीप जोशींनी शीं ही मालिका स्विकारली तेव्हा त्यांनी जराही अंदाजा नसेेल की ही मालिका त्यांना एक दिवस यशशिखरावर पोहचवेल.

पण तुम्हाला माहिती आहे का ? जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांना ऑफर करण्यापूर्वी ब-याच कलाकारांना यासाठी विचारणा करण्यात आली होती. अभिनेते योगेश त्रिपाठीला या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण त्यावेळी बिझी असल्यामुळे नकार दिला होता. आज ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत योगेश त्रिपाठी झळकत आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता किकू शारदा, अली असगर,स्टॅण्डअप कॉमेडीयन एहसान कुरेशीलाही विचारणा झाली होती. इतकेच काय तर राजपाल यादवलाही जेठालाल भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

मात्र सिनेमा सोडून छोट्या पडद्यावर काम करण्यास तयार नसल्याने राजपाल यादवने या भूमिकेला नकार दिला होता. या सगळ्या अभिनेत्यांनी नकार दिल्यानंतर दिलीप जोशी यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.आपल्या अनोख्या स्टाईलमुळेच दिलीज जोशी यांनीही भूमिका प्रचंड गाजवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12