चित्रपटातील किसिंग सीनबाबत ललित प्रभाकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला; ‘मला याची सवय आहे म्हणून मी…’

अलीकडच्या काळात मराठी सिनेसृष्टी देखील बऱ्यापैकी बिनधास्त झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टी आज चांगलीच मोठी झाली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकणारे स्टार्स देखील चांगलेच मोठे सेलिब्रिटी समजले जातात.
एखाद्या सिनेमा मधून नावारूपास आलेला अभिनेता किंवा कलाकार हमखास यश मिळवतोच. या कलाकारांची लोकप्रियता आज शिगेला पोहोचल्याच आपण बघत आहोत. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी हिंदी सेलिब्रिटींना देखील मागे टाकले आहे. बदलत्या काळासोबत आता मराठी सृष्टीमध्ये देखील कमालीचे बदल झाले आहेत.
आता चित्रपटाची आणि कथानकाची गरज म्हणून मराठी सिनेमांमध्ये देखील किसिंग आणि लव्ह मेकिंग सेंटर दाखवले जातात नुकताच प्रदर्शित होणार आहे का चित्रपटातील किसिंग सीन आता चर्चेत आला आहे टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर आधी राज्य गाजवून आता अभिनेता ललित प्रभाकर टर्री’ चित्रपटातून सिने विश्वात पदार्पण करत आहे.
सध्या ललित या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ललितने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याने नाटक, मालिका यामध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे ललित घराघरात पोहोचला. ‘आनंदी गोपाळ’, ‘झोंबिवली’ यांसारख्या चित्रपटातील त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
आगामी चित्रपट टर्रीमधे तो मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री गौरी नलावडेने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. काहीच दिवसांपूर्वी ‘टर्री’ चित्रपटातील गाणी प्रदर्शित करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांनीही पसंती दर्शविली आहे. यामधील ‘क्षण हळवा’ गाण्यात गौरी व ललितच्या रोमान्सची झलक पाहायला मिळाली होती.
सांगितलं जात आहे की, गौरी व ललितने या गाण्यात किसिंग सीन्सही दिले आहेत. याबाबत ललितने भाष्य केलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ललितला चित्रपटातील किसिंग सीनबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ललित गमतीशीर पद्धतीने म्हणाला, ‘माझ्यासाठी हे काय नवीन नाही हे माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनातील आहे.’
त्यानंतर ललित किसिंग सीनबाबत बोलताना तो म्हणाला, ‘सिनेमातील त्या दोन पात्रांचा तो पहिला किस दाखवण्यात आला आहे. किसिंग सीन देण्यामागे अनेक गोष्टी असतात. नुसतं स्क्रीनसमोर आलं आणि किसिंग सीन दिला असं होत नाही. चित्रपटातील किसिंग सीन बघताना लोकांनाही छान वाटलं पाहिजे.ते प्रेक्षकांच्या अंगावर येता कामा नये.’
दरम्यान, ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असलेला ‘टर्री’ हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश काळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एक हटके लव्ह स्टोरी या चित्रपटांमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल असं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.