घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, १५ वर्षाचा संसार मोडण्याचं सांगितलं कारण…

बॉलिवूडमध्ये अभिनेता अमीर खान याला मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते. आमिर खान जो काही करतो तो अतिशय जबरदस्त असे असते आणि ते भव्य दिव्य असते. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठे कार्य केले आहे. राज्य सरकारने त्याचा या कार्यासाठी गौरव देखील केलेला आहे.
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त अशा भूमिका केलेल्या आहेत. वर्षातून केवळ एकच चित्रपट करायचा असे धोरण त्याने स्वीकारले आहे. त्यामुळे त्याचे सगळे चित्रपट हे हिट होत असतात. लगान चित्रपटामध्ये त्याने जबरदस्त अशी भूमिका केली. हा चित्रपट ऑस्कर वारी साठी गेला होता.
या चित्रपटानंतर त्याची किरण राव या दिग्दर्शिकेची सोबत ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या आणि त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले. यासाठी आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिमा हिला घट’स्फो’ट दिला होता. आमिर खान याला आपल्या पत्नीपासून दोन मुलं देखील आहेत. असे असले तरी त्याने किरण राव सोबत लग्न केले.
मात्र त्याने जुलै २०२१ मध्ये त्याच्या घ’टस्फो’टाची घोषणा केल्यानंतर अनेकांना मोठा ध’क्का बसला होता. लग्नाच्या १५ वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव वेगळे झाले. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. एक आदर्श कपल म्हणून आमिर आणि किरणकडे बघितलं जात होत.
पण अचानक दोघांनी घ’टस्फो’ट घेतल्यामुळे अनेक जण चकित झाले होते. पण आता मात्र घटस्फो’टाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं यावर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत त्यानं किरण रावसोबत घटस्फोट होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. आमिर खाननं ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या घटस्फो’टावर भाष्य केलं.
किरण रावला घटस्फो’ट देण्याच्या मुद्द्यावर तो म्हणाला, ‘ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिनं मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी तिची इच्छा अजिबात नाही. कारण मी जर बदललो तर तो व्यक्ती राहणार नाही ज्या व्यक्तीवर तिनं प्रेम केलं होतं.
असं तिचं म्हणणं होतं. तिचं माझ्या बुद्धीवर आणि व्यक्तीमत्त्वावर प्रेम होतं त्यामुळे मी कधी स्वतःला बदलावं अशी अपेक्षा तिने कधीच केली नाही. आमिर पुढे म्हणाला, ‘पण जेव्हा किरणनं मला ७ वर्षांपूर्वी सांगितलेल्या काही गोष्टींवर जेव्हा मी आज विचार करतो तेव्हा मी एक सांगेन की मागच्या ६-७ महिन्यांमध्ये मी स्वतःमध्ये बरेच बदल होताना पाहिले आहेत.’
जेव्हा आमिरला घटस्फो’टाच्या कारणाविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, ‘किरणजी आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा आणि आदर आहे. लोकांना आमच्या बॉन्डिंगबद्दल समजत नसेलही. आम्हाला समजणं कठीण आहे. कारण जेव्हा एक विवाहित जोडपं वेगळं होतं तेव्हा त्यांच्यामध्ये असं बॉन्डिंग पाहायला मिळत नाही जे आज आमच्यात आहे.
किरण आणि माझा घटस्फो’ट होण्याचं कारण दुसरं कोणतंही नातं नव्हतं. आमच्या घटस्फो’टानंतर माझं फातिमा सना शेखशी अफे’अर असल्याच्या अ’फवा उडाल्या होत्या. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. माझं तेव्हाही कोणाशी अफे’अर नव्हतं आणि आताही मी कोणत्याही व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नाही.’
दरम्यान आमिर खाननं पहिली पत्नी रिना दत्तापासून २००२ साली घटस्फो’ट घेतला होता. त्यानंतर ३ वर्षांनी २००५ साली त्यानं किरण रावशी लग्न केलं. आमिर आणि किरण यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २०११ साली या दोघांचा मुलगा आझादचा जन्म झाला. किरण राव आणि आमिर यांनी सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.