घटस्फो’टाची चर्चा होत असताना सिद्धार्थने केलेली पोस्ट पुन्हा व्हायरल, म्हणाला, ‘प्रेम अशा व्यक्तीवर करा ज्यांना…’

घटस्फो’टाची चर्चा होत असताना सिद्धार्थने केलेली पोस्ट पुन्हा व्हायरल, म्हणाला, ‘प्रेम अशा व्यक्तीवर करा ज्यांना…’

माघील काही काळापासून सगळीकडेच सेलिब्रिटींच्या घटस्फो’टाच्या बा’तम्या समोर येत आहेत. या बा’तम्यांमुळे काही काळ का होईना चाहते चांगलेच नाराज होतात. समंथा- नागा चैतन्य, आमिर खान-किरण राव, सोहेल खान-सीमा सचदेव, सारख्या सेलिब्रिटींनी आपण घट’स्फो’ट घेत असल्याचं जाहीर करत चाहत्यांची मन दुखावली होती.

आता असंच काही मराठी चाहत्यांच्या बाबतीत देखील घडत आहे. एका जोडीच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. ही जोडी अजून कोणती नसून आपल्या सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधवची आहे. एक उत्तम अभिनेता, भन्नाट विनोदवीर आणि मराठी मनोरंजन सृष्टीमधील स्टाईल आयकॉन अशा अनेक नावांनी सिद्धार्थ जाधवला ओळखलं जात.

सध्या त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याच्या वैय’क्तिक आयुष्यात सध्या बरंच काही घडत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याची पत्नी तृप्ती आणि सिद्धार्थ यांच्यात दुरावा अल्याचं म्हटलं जात आहे. त्या दोघांनी माघील एक- डिड वर्षांपासून सोबत एक देखील फोटो शेअर केला नाहीये.

दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर अचानकच तृप्तीनं तिच्या नावात बदल केला. तिनं जाधव हे आडनाव काढून टाकलं. त्यामुळे तर आता ठिणगीला हवा मिळाल्यासारखं चित्र उभं राहील आहे. सिद्धार्थनं मात्र या सर्व अफ’वा असल्याचं म्हटलं आहे.

पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या नात्याबद्दल चर्चा होतेय असं नाहीय. यापूर्वी देखील अनेकदा दोघं चर्चेत आले आहेत. मात्र त्यावेळी त्याची कारणं देखील वेगळी होती. या जोडीकडे कपल गोल्स देणारं जोडपं म्हणून पाहिलं जात होतं. तृप्तीच्या वाढदिवसाला दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर केली होती.

तृप्तीसाठी आपल्या मनात असणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘सिद्धू ते सिद्धार्थ जाधव होण्यापर्यंतच्या प्रवासात तू साथ दिली म्हणून हा प्रवास शक्य झाला. तुझी साथ आणि माझ्या आयुष्यात तुझी जागा मोलाची आहे,’ असं म्हणत अत्यंत भावुक करणारी पोस्ट सिद्धार्थ जाधवन लिहली होती.

यावरून आपल्या पत्नीची त्याच्या आयुष्यात काय जागा आहे, हे स्पष्ट होते. आता त्या दोघांचं नातं खरोखरच संपत की, काय अशी चर्चा सुरु आहे. दुबईच्या फॅमिली ट्रिप नंतर आता सिद्धार्थनं त्याची मुलगी ‘स्वरा’ हिच्या वाढदिवसाचे काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये स्वरा आणि सिद्धार्थची खास बॉण्डिंग तर दिसतेच मात्र सोबतच तृप्ती देखील या पार्टीमध्ये भलतीच आनंदी दिसली.

या पार्टीच्या फोटोंद्वारे सिद्धार्थने त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम लावला आहे. मात्र असं असलं तरीही सिद्धार्थच्या इन्स्ट्राग्राम पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेम नक्की कोणत्या व्यक्तीवर करावे, असा सल्ला सिद्धार्थने आपल्या या स्टोरीमध्ये दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे.

“आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही.” असं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थने पोस्ट केलं आहे. त्यामुळे नक्की त्याच्या आणि तृप्तीच्या नात्यामध्ये काय सुरु आहे याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.