घ’टस्फो’टाचे इतक्या दिवसांनंतर सैफला आली अमृताची ‘आठवण’, म्हणाला ‘करीना’ नाही तर ‘अमृता’कडून शिकलो या गोष्टी…

आपल्याला माहित आहे कि अभिनेता सैफ अली खानने आजवर बरेच हि’ट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. शिवाय चित्रपटांमधील त्याच्या हटके भूमिकांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण त्याच बरोबरीने त्याचं खाजगी आयुष्य देखील कोणापासून लपून राहिलेलं नाही.
अभिनेत्री करिना कपूर खान ही त्याची दुसरी पत्नी असून सैफ-करिनाचा सुखाचा संसार सध्या सुरु आहे. आणि पुढील महिन्यांतच त्याच्या घरी आणखी एका नव्या पाहुण्याच आगमनही होणार आहे. पण सैफ अजूनही त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंगला विसरु शकला नाही.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या पहिल्या पत्नीबद्दल म्हणजेच अमृता सिंगबद्दल भाष्य केले. सैफ अली खान आणि अमृता सिंह 16 वर्षांपूर्वी घ’टस्फो’ट घेऊन वेगळे झाले आहेत. या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं आणि 2004 मध्ये घ’टस्फो’ट घेतला. घ’टस्फो’टा नंतर तब्बल 16 वर्षांनी सैफने त्याच्या मनातील सल पहिल्यांदा बोलून दाखवली आहे.
नुकतंच सैफने मुलाखतीत आपल्या घ’टस्फो’टाबद्दलचं दुःख बोलून दाखवलं आहे. या मुलाखतीत सैफ भावूक झाला असून त्याने ही जगातील सर्वात वा’ईट गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. सैफच्या मते अमृताकडून शिकायला मिळालं ते करीनकडून कधीच शिकायला मिळणार नाही.
सैफने ही गोष्ट पिंकविला वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. सैफने अमृतासोबतच्या घ’टस्फो’टावर म्हटलं आहे की, घ’टस्फो’ट ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. आमच्यात जे काही घडलं त्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हायला हवं होतं. मला वाटत नाही की या गोष्टीचा ता’ण कधी कमी होईल.
काही गोष्टी आपल्याला शांतता देत नाहीत त्यातीलच ही एक गोष्ट आहे. पुढे सैफ म्हणाला की, मी तेव्हा फक्त 20 वर्षांचा होतो. अमृता माझ्यापेक्षा वयाने मोठी आणि जबाबदार होती. तिच्याच कडून सुखी संसाराच्या अनेक गोष्टी शिकायला भेटल्या. जवळून बघायला भेटल्या. घ’टस्फो’टांनंतरही तिने दोन्ही मुलांचा सांभाळ व्यवस्तीत रित्या केला. आज गोष्टी खूप बदलल्या आहेत.
आपण कायमच विचार करतो की, आ’ई-बाबा दोघे कायम एकत्र राहतील. पण ती दोन्ही वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. आज आपण मॉर्डन रिलेशनशिपबद्दल बोलतो. कोणत्याही मुलाला आपल्या घरातील उबदार वातावरणापासून वंचित ठेवायला हवं.
पुढे मुलाखतीत सैफला इब्राहिम आणि साराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सैफ म्हणाला की,’कोणत्याही मुलाला त्याच्या घरापासून, कुटुंबापासून असं सहज दूर करता कामा नये. या सगळयांचा मुलांवर खूप वा’ईट प’रिणाम झाला. अनेकदा परिस्थिती वेगळी असते. पालक एकत्र नसल्यावर अनेक गोष्टी समोर येतात.
अशावेळी एक स्टेबल घर आणि वातावरण मुलांना मिळणं खूप गरजेचं आहे असे तो म्हणाला. शिवाय सैफ अली खान लवकरचं त्याच्या आलिशान पतौडी पॅलेसमध्ये शिफ्ट होणार असल्याचे कळते आहे. यावर खुद्द सैफ अली खान म्हणाला की, पतौडी पॅलेसमध्ये राहायला जाणं ही कल्पना छान आहे आणि करीनाची सुद्धा अशी इच्छा आहे.
पुढे तो म्हणाला की, असे केल्याने खरंच खूप मजा येईल. म्हणजे इथे जलतरण तलाव असल्याने आम्हाला वाटेल तेव्हा पोहू शकू, छान जेवण बनवू शकू, पुस्तके वाचायला वेळ मिळेल. याशिवाय संपूर्ण कुटुंबाला एकत्र राहता येईल. परंतु, या पॅलेसजवळ सध्या चांगल्या शाळांची गरज असल्याचेही सैफ म्हणाला.
आपणास सांगू इच्छितो कि सैफ अली खानच्या कुटुंबाने या पॅलेसला एका हॉटेलसमूहाला भाडेतत्वावर वापरण्यासाठी दिला होता. मात्र, आता त्यांनी हा करार रद्द करून ‘पतौडी पॅलेस’ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे.