गौतमी पाटीलसोबत पहिल्याच चित्रपटात झळकणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता; समोर आले फोटो…

गौतमी पाटीलसोबत पहिल्याच चित्रपटात झळकणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता; समोर आले फोटो…

गौतमी पाटीलबाबत आज कुणाला नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही तिला फॉलो केलं नसेल किंवा गुगलवर तिच्या बद्दल सर्च केले नसेल तरी तीच नाव तुम्ही नक्की ऐकलं असणार यावरून तुम्ही गौतमी पाटीलच्या प्रसिद्धीचा अंदाज लावू शकता. खूपच कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी होणारी गौतमी पाटील कदाचित महाराष्ट्रही पहिली व्यक्ती असेल.

आपल्या डान्सने प्रसिद्धी असणारी गौतमी पाटील सध्या सोशल मीडिया स्टार झाली आहे. खूप कमी कालावधीमध्ये तिने आपल्या ठसकेबाज लावणीने महाराष्ट्रातील जनतेला वेड लावले आहे. तिचा डान्स बघणाऱ्यांची संख्या एवढी आहे कि गर्दीमध्ये अक्षरशः एकाच मृ त्यू झाला होता. यावरून तुम्ही तिच्या चाहत्यांचा अंदाज लावू शकता.

दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर तिचे फॉलव्हर्स देखील वाढताना दिसत आहेत. पण काही दिवांपासून गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. गौतमीनं गेल्या काही दिवसांत माध्यमांना मुलाखतीसुद्धा दिल्या. ज्या अ’श्लील नृत्यामुळं तिच्यावर अनेकांनी ठीक केली होती, त्याबाबत तिनं स्पष्टीकरणही दिलं.

अनेकांनी तिच्या शोवर बं’दी घालण्याची मागणी केली होती. म्हणून तिने स्वतः माध्यमांना मुलाखती देऊन माझ्या शोवर बंदी घालणे चुकीचे आहे तसेच मी कसलेच अ’श्लील नृत्य करत नाही असे तिने सांगितले होते. पाहता पाहता वा’दाच्या भोवऱ्यात अडकलेली ही गौतमी सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्धीझोतात आली.

कालपर्वापर्यंत कोण कुठली गौतमी अनेकांना ठाऊकही नव्हती. पण, एका व्हायरल व्हिडीओनं तिला द्यायची ती प्रसिद्धी दिलीच. आता तर म्हणे ती चित्रपटातूनही झळकणार आहे. विविध कार्यक्रमांना दिसणारी ही सुंदरा आता मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळं तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

गौतमीच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, ‘घुंगरु’. सोलापूर, माढा, हंपी इतकंच नव्हे तर पार परदेशात थायलंडमध्ये तिच्या या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पडलं आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनही केल्याचं कळत आहे.

चित्रपटातून ती नेमकी कोणासोबत झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असतानाच आता त्याचाही उलगडा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खुद्द बाबा गायकवाडच गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. एका लोकप्रिय मराठी मालिकेतून गायकवाड झळकले होते. कलेसोबतच राजकारण आणि समाजकारणाची त्यांना आवड.

पण, आता गौतमीसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारही झळकणार आहेत. कलावंत आणि त्यातही लोककलावंतांच्या आयष्यावर कटाक्ष टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का, यावरच आता अनेकांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12