खलनायक प्राण यांच्या मुलीला पाहिलंत का ? दिसते खूपच सुंदर आणि हॉट, तिच्यासमोर जानव्ही आणि साराने देखील टेकले हात..

कोणत्याही चित्रपटात नायक म्हणजेच हिरोची भूमिका कोणी साकारली हे कायम सर्वांच्या ध्यानात असतं. मात्र त्याच चित्रपटामध्ये खलनायक कोण होता, हे आठवायला बऱ्याचवेळा बुद्धीवर ताण द्यावा लागत असे. सुरुवातीच्या काळात बॉलीवूडमध्ये असच चित्र होत.
हिरोची भूमिका साकारणारा कलाकार सुपरस्टार तर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला तेवढी लोकप्रियता मिळत नव्हती. मात्र काळासोबत हा कन्सेप्ट देखील बदलला. मधल्या काळात तर खलनायकांचे पात्र रेखाटणाऱ्या अनेक कलाकारांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती.
अमरीश पुरी, ओम पुरी, अनुपम खेर, प्रेमनाथ, परेश रावल, प्राण सारख्या कलाकारांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल. यापैकी प्राण यांनी खलनायकाचे पात्र रेखाटण्यासोबतच इतर अनेक भूमिका देखील साकारल्या. त्यांची कॉमेडी टायमिंग देखील खूप परफेक्ट होती त्यामुळेच तर त्यांनी अनेक कॉमेडी सिनेमात देखील काम केलं होत.
३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी बॉलीवूडमध्ये काम केलं होत. कोणत्याही प्रकारची भूमिका साकारताना प्राण त्या पात्राशी एकरुप होऊन जात. त्यामुळे त्यांनी रेखाटलेली जवळपास सर्वच पात्र आजदेखील रसिकांच्या ध्यानात आहेत. आज प्राण आपल्यात नाहीयेत. मात्र आपल्या कामाच्या रूपात ते आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये जिवंत आहेत.
तसे तर चित्रपटांमध्ये प्राण यांची केवळ झलक देखील लोकांमध्ये भीती निर्माण करायची. हा अभिनेता आज आपल्यात नसला तरी त्याचा दमदार आवाज आणि दमदार अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहेत. प्राण यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद होते. पण चित्रपटांमध्ये ते प्राण या नावानेच ओळखले जायचे. प्राण यांनी 1945 मध्ये शुक्ला सिकंदशी लग्न केले.
या खलनायकाला 3 मुलेही आहेत. प्राण यांची एक मुलगी आणि दोन मुलगे आजही या अभिनेत्याच्या आठवणी जपत आहेत. या खलनायकाची मुलं लाइमलाइटपासून दूर राहतात. पण जर आपण या खलनायकाची मुलगी पिंकी सिकंदबद्दल बोललो तर ही स्टारकिड सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.
या खलनायकाची लाडकी मुलगी पिंकी सिकंद हिने सुप्रसिद्ध उद्योगपती विवेक भल्लासोबत लग्न केले आहे. पिंकी चित्रपटांच्या झगमगातापासून दूर आयुष्य जगत आहे. सध्या या स्टारकिडचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पिंकी तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या चौकासमोर उभी असलेली दिसत आहे.
या फोटोमध्ये ती लाल रंगाचा सूट परिधान करताना दिसत आहे. तिचे सौंदर्य बघून नेटिझन्स तिच्या प्रेमातच पडले आहेत. दरम्यान, प्राणबद्दल बोलायचे झाले, तर या अभिनेत्याचा ते त्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत समावेश होता. प्राण यांनी 362 हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘जंजीर’, ‘अमर अकबर, अँथनी’, ‘डॉन’, ‘पूरब और पश्चिम’ आणि ‘शहीद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राण झळकले आहेत.