कोणत्याही अरबपतीपेक्षा कमी नाही ‘या’ गरीब घरातील अभिनेत्याची लाईफ स्टाईल, पहा 55 चित्रपटातून कमावले 400 करोड रुपये…

बॉलीवूड मध्ये नशीब आणि टॅलेंट याच्या बळावर काळ रस्त्यावर साधारण लोकांसारखा फिरणारा व्यक्ती देखील एक मोठा सेलेब्रिटी होऊ शकतो. अनेक सेलेब्रिटीजच्या संघर्षातून हे आपल्या सर्वांच्या समोर आलेच आहे.
इरफान खान यांच्याकडे एके काली ज्युरासिक पार्क सिनेमा बघण्याचे पैसे नव्हते, अंतर आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या बळावर त्याने चक्क त्या सिनेमाच्या सिरीज मध्ये काम केले. तसेच अगदी छोटे रोल्स करुन मोठ्या रोल च्या प्रतीक्षेत असणाऱ्या, नवाजुद्दीक सिद्दीकीची गँग्स ऑफ वासेपूरमुळे नशीबच पालटले.
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये, पाकिटमाराचा काही मिनिटांचा रोल करणारा नावाजुद्दिन आज मोठाल्या सेलिब्रिटीज पैकी एक आहे. केवळ नवाजुद्दीन च नाही तर, अनेक कलाकारांचे पूर्ण नशीबच गँग्स ऑफ वासेपूर मुळे बदलले. हुमा कुरेशी,जयदीप अहलवाद, राजकुमार राव, तिगमांशू धुलिया आणि पंकज त्रिपाठी या सर्वच कलाकारांना एक नवीन ओळख या सिरीज मधून मिळाली.
पंकज त्रिपाठी यांनी गँग्स ऑफ वासेपूर च्या आधी देखील अनेक सिनेमामध्ये आणि काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मात्र या सिरीजमुळे त्यांच्या अभिनयाचे सगळीकडेच तोंडभरून कौतुक झाले. पंकज त्रिपाठी, यांचा बिहारच्या एका छोट्याशा गावात जन्म झाला, आणि अगदी सर्वसाधारण कुटुंबातील ते आहेत. त्यांना ६ भावंडं असून पंकज सगळ्यात छोटे आहेत.
सुरुवातीच्या काळात काम मिळण्यासाठी देखील संघर्ष करत असणारे पंकज त्रिपाठी आज मात्र ४०० कोटींचे मालक आहेत. ल्युडो, जॉली एलएलबी, सारख्या काही सिनेमामध्ये तर सेक्रेड गेम्स, क्रिमिनल जस्टीस आणि मिर्झापूर सारख्या सिरीजमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कौतुक कमवले.
एका सर्वसाधारण कुटुंबातून येणारे पंकज आज, एका सिनेमासाठी ३-४ कोटी तर एका सिरीज साठी ७-८ कोटी रुपये चार्ज करतात. आजवर त्यांनी सिरीज आणि सिनेमा मिळउन ५५ प्रोजेक्ट्स मध्ये काम केले आहे. १० वि पर्यंत पंकज यांच्या घरी टीव्ही नव्हता म्हणून त्यांना सिनेमाबद्दल काहीच माहिती नव्हती.
मात्र आज ‘कालीन भैयाजी’ याच चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचा कलाकार आहे. बिहार मधील बेसलंड येथील अगदी पॉश भागात पंकज यांचे घर आहे. १६ कोटी इतकी त्यांच्या सुंदर अश्या घराची किंमत आहे. केवळ तिथेच नाही मुंबई, बेंगलोर अश्या काही भागात देखील त्यांची संपत्ती आहे.मर्सडीज बेन्ज E२००, फॉर्च्युनर अश्या अनेक लॅक्झीरियस कार पंकज यांच्या कडे आहेत.