कॉमेडियन भारती सिंहने पुन्हा दिली गुड न्यूज ! Video शेअर करत म्हणाली….

कॉमेडियन भारती सिंग हे आपल्या मनोरंजन सृष्टीमधील एक लोकप्रिय नाव आहे. केवळ आपल्या भारतातच नाही तर जगभरात भारती आपल्या कॉमेडी टायमिंग आणि हटके विनोदीशैलीसाठी प्रसिद्ध आहे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. भारतीचा थाट एखाद्या बॉलीवूड सेलेब्रिटी पेक्षा नक्कीच कमी नाहीये.
ज्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे प्रेक्षक दिवाने असतात, ते कलाकार भारतीचे चाहते आहेत. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख पासून न्यू हार्टथ्रोब कार्तिक आर्यन, वा’दग्र’स्त अभिनेत्री कंगना पासून सुपरहिट अभिनेत्री दीपिका पदुकोण पर्यन्त सगळेच तिचे फॅन आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे.
दिग्ग्ज कलाकारांपासून ते सर्व साधारण पर्यंत तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. भारतीने स्वतःच्या बळावर स्वतःची खास ओळख निर्माण केली. २००८ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅम्पियनशिप मधून तिला आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पहिले.
आज १४ वर्ष झाले ती सतत काम करत आपल्या चाहत्यांच मनोरंजन करतच आहे. मध्यम उंचीची, गोल मटोल मुलगी, दिसायला जेमतेम तिला बघून कोणीही अपेक्षा केली नव्हती की, भारती सिंग एक दिवस इतकी मोठी स्टार बनेल. पण आपल्या खास हटके विनोदीशैलीमुळे आणि परफेक्ट कॉमेडी टायमिंगमुळे तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
भारतीने टेलिव्हिजन अवॉर्ड्स पासून फिल्मफेअर पर्यंत अनेक अवॉर्ड शोचे सूत्रसंचालन केले. टेलिव्हिजन वरील अनेक रियालिटी शोमध्ये तिने अँकरिंग केलं आणि अद्याप देखील करत आहे. स्टेजवर भारती आहे म्हणल्यावर मेकर्स बिनधास्त असतात. कारण प्रेक्षकांचा मनोरंजन करत क्षणात त्यांना पोट धरून हसायला लावण्यात भारती सर्वात पुढे आहे.
आता भारतीच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे. तिने आपल्या मातृत्वाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. भारतीच्या आयुष्यात काय घडत त्याबद्दल सर्वच काही जाणून घेण्यासाठी चाहते कायम आतुर असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारती देखील आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल चाहत्यांना सांगत असते.
आता अशीच एक बातमी भारतीने पुन्हा एकदा शेअर केली आहे. भारतीने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने एक अतिशय खास ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे; या बातमीने कपलचे चाहतेही खूप खूश आहेत आणि दोघांचे अभिनंदन करत आहेत.
कॉमेडियन भारती सिंहने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक खास ‘गुड न्यूज’ दडलेली आहे. हा व्हिडिओ भारती आणि हर्षचा मुलगा ‘गोला’चा आहे ज्यामध्ये तो पहिला शब्द बोलतांना दिसत आहे. नऊ महिन्यांचा ‘गोला’ पहिल्यांदाच बोलल्याने भारतीने त्याचा विडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हर्ष गोलाचे रेकॉर्डिंग करत असून गोल भारतीच्या मांडीवर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारती गोलाला ‘मम्मा’ म्हणण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याने पहिला शब्द ‘पप्पा’ बोलला. व्हिडिओमध्ये गोलाच्या तोंडून ‘पापा’ ऐकून हर्ष कॅमेऱ्याच्या मागून ओरडतो – ‘पापा बोल दिया’ आणि भारतीही तिच्या मुलाचा पहिला शब्द त्याच्या तोंडून ऐकून खूप आनंदी आहे.