कित्येक वर्षांनंतर ‘जया’ बच्चनचे फिल्मी दुनियेत कमबॅक, हिंदी नाही तर या ‘मराठी’ सि’नेमात करणार काम…

कित्येक वर्षांनंतर ‘जया’ बच्चनचे फिल्मी दुनियेत कमबॅक, हिंदी नाही तर या ‘मराठी’ सि’नेमात करणार काम…

अभिनेत्री जया बच्चन या बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. 1973 साली त्यांनी बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही मोजके चित्रपट वगळता जय बच्चन चित्रपट सृष्टीपासून लांबच राहिल्या. खा’सगी जीवनाला, कुटुंबाला त्यांनी दरम्यानच्या काळात प्राधान्य दिलं.

2013 मध्ये ‘सनग्लासेस’ या चित्रपटातून त्या शेवटच्या झळकल्या होत्या. आता जया बच्चन यांच्या कमबॅकबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. आता तब्बल सात वर्षानंतर त्या चित्रपटांमधून पुनरागमन करणार आहेत. विशेष म्हणजे जया बच्चन एका मराठी सिनेमातून कमबॅक करणार आहेत. होय, एका मराठी चित्रपटातून.

जया बच्चन पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करणार आहेत. शी द पीपल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जया बच्चन लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहेत. हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा असेन. अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या सिनेमात जया दिसणार आहे.

या सिनेमाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. अवघ्या 20 दिवसांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. अद्याप जया वा मेकर्सकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ही बातमी वाचून जया बच्चनचे चाहते आनंदात आहेत. 7 वर्षांपूर्वी रितुपर्णो घोष यांच्या ‘सनग्लास’ या सिनेमात जया अखेरच्या दिसल्या होत्या.

यात त्यांनी पहिल्यांदा नसीरूद्दीन शहासोबत काम केले होते. खास बात म्हणजे, हा सिनेमा कधी रिलीजच झाला नाही. 2016 मध्ये ‘की अँड का’या सिनेमात त्यांनी कॅमिओ रोल केला होता. यानंतर त्या कोणत्याही सिनेमात दिसल्या नाहीत. जया बच्चन यांनी चार दशकांचा काळ गाजविला आहे.

वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. पाठीवर रूळणारे लांबसडक केस आणि हसण्याचा एक वेगळा अंदाज यामुळे त्यांनी पे्रक्षकांना त्यांनी भुरळ घातली. 1971 मध्ये जया बच्चन यांचा ‘गुड्डी’ हा सिनेमा हिट झाला आणि यानंतर एकामागून एक अनेक चित्रपट केले.

जया बच्चन यांचा पहिला चित्रपट बंगाली होता. या चित्रपटाचे नाव होते, ‘महानगर’. यावेळी जया केवळ 15 वर्षांच्या होत्या. ‘महानगर’ नंतर जया बच्चन यांनी अनेक बंगाली चित्रपटांत काम केले. 1971 मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव होते, ‘गुड्डी’. हा सिनेमा सुपरडुपर हि’ट झाला आणि यानंतर जया मुंबईला शिफ्ट झाल्यात. पुढे त्यांनी रा’जकारणातही प्रवेश केला.

तसेच अलीकडेच त्यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. बॉलिवूडला ड्र ग्स’च्या मुद्द्यावरुन ब’दनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड ते रा’जकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्र’तिक्रिया उमटल्या होत्या.

आजवर हिंदी चित्रपट विश्वात नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक कलाकारांनी मराठी कलाविश्वातही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. किंबहुना प्रेक्षकांनीही अशा कलाकारांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं आता जया बच्चन यांच्या नव्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12